प्रत्येक भारतीयाचा लष्कराला सलाम

By admin | Published: September 30, 2016 02:35 AM2016-09-30T02:35:41+5:302016-09-30T02:35:41+5:30

नियंत्रण रेषे पलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर गुरुवारी पहाटे करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे वृत्त येताच देशात आनंद आणि समाधानाचे वातावरण पसरले.

Salute to every soldier's army | प्रत्येक भारतीयाचा लष्कराला सलाम

प्रत्येक भारतीयाचा लष्कराला सलाम

Next

नवी दिल्ली : नियंत्रण रेषे पलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर गुरुवारी पहाटे करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे वृत्त येताच देशात आनंद आणि समाधानाचे वातावरण पसरले.
पाकिस्तानकडून सीमेवर सतत होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि तेथील दहशतवाद्यांनी काश्मिरात घातलेला गोंधळ याच्यामुळे भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण होतेच. उरी हल्ल्यानंतर तर पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा, अशी इच्छा भारतीयांमध्ये दिसत होती. त्यामुळेच लष्करी कारवाईची बातमी कळताच, साऱ्या भारतीयांनी तिचे स्वागत केले. आमच्यात एरवी कितीही मतभेद असले तरी देश संकटात असताना सारे भारतीय कसे एकत्र येतात, याचेच दर्शन घडले.
लष्करी कारवाईचे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही स्वागत केले. आम्ही पूर्णपणे लष्कराच्या बाजुने उभे आहोत, असे पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे त्यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना या कारवाईची सविस्तर माहिती दिली.
काँग्रेसचे नेते अहमद पटेल म्हणाले की, दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई केल्याबद्दल आम्ही लष्कराचे अभिनंदन करतो. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, लष्करी कारवाईला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील लष्करी कारवाईचे भाजपने स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. मोदी यांचे सरकार हे कृतीवर भर देते, शब्दांवर नाही. आम्ही सशस्त्र दलांना प्रणाम करतो। पाकपुरस्कृत दहशतवादापासून आमच्या सीमांचे रक्षण केल्याबद्दल मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करतो. जबाबदार सरकार बोलते कमी व कृती जास्त करते. मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारचे हे धोरण आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले.
दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण ठिकाणांवर जी धाडसी कारवाई केली त्याबद्दल आम्हाला या दलांचा अभिमान वाटतो, असे केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले. पाकिस्तानातूनच जन्माला येणाऱ्या दहशतवादाला रोखण्यासाठी राजनैतिक पातळीवर वारंवार प्रयत्न करण्यात आले परंतु पाकने वर्तन सुधारून घेतले नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे भाजपचे सरचिटणीस राम माधव म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

मेहबुबा मुफ्ती यांची चिंता
श्रीनगर : केंद्रीय गृाहमंत्री राजनाथ सिंग यांनी या कारवाईची माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना दिली होती. त्यानंतर या कारवाईचे परिणाम भारतीय सीमेवर असलेल्या गावांवर होणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रकारांमुळे निष्पाप लोकांना त्रास सहन करावा लागेल, असे सांगून, त्यांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली.

Web Title: Salute to every soldier's army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.