एक 'सॅल्यूट' तर बनतोच यार... बारामुल्लानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य 'मिशन काश्मीर'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 09:33 AM2019-01-25T09:33:27+5:302019-01-25T09:34:59+5:30

जवानांच्या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे.

A 'salute' to indian Army... After the Baramulla, the mission of the Indian army is 'mission Kashmir' | एक 'सॅल्यूट' तर बनतोच यार... बारामुल्लानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य 'मिशन काश्मीर'

एक 'सॅल्यूट' तर बनतोच यार... बारामुल्लानंतर भारतीय सैन्याचं लक्ष्य 'मिशन काश्मीर'

Next

श्रीनगर - भारतीय सैन्याची कामगिरी नेहमीच देशातील नागरिकांना अभिमान वाटेल अशी असते. जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं, तेव्हा इंडियन आर्मी धावून येते. कागरिलचं युद्ध असो, त्सुनामी असो, मुंबईतील 26/11 चा दहशतवादी हल्ला असो वा केरळ, उत्तराखंडचा धुव्वादार पाऊस असो भारतीय सैन्य जिवाची बाजी लावून आपलं कर्तव्य बजावतात. सैन्याच्या या कार्यबद्दल आपण त्यांचे कौतुक करतोच, पण आज पुन्हा एकदा भारतीय सैन्यानं कौतुकास्पद कामगिरी केली आहे. दहशतवाद्यांच्या छुप्या कारवाईंनी ग्रासलेल्या काश्मीर खोऱ्यातील 'बारामुल्ला' हा जिल्हा दहशतवादमुक्त करण्यात सैन्याला यश आले आहे. भारतीय सैन्याच्या या कामगिरीला एक सॅल्यूट तर बनतोच. 

बारामुल्लामधून हिज्बुल 'ऑल आउट'; काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कमाल

जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या दशकभरापासून दहशतवाद्यांच्या छुप्या कारवाया सुरूच आहेत. तर, पाकिस्तानकडूनह त्याला खतपाणी घालण्यात येत असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. मात्र, भारतीय सैन्यानं या दहशतवादी कारवायांना चांगलाच चाप लगावला. सैन्यानं बारामुल्ला जिल्हा दहशतवादीमुक्त केला असून आता काश्मीर खोऱ्यातील एक-एक दहशतवादी ठार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सीमारेषेपलिकडून वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम हाती घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केल्याचं दिसत आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवत कधी काळी हिज्बुलचा गड मानल्या जाणाऱ्या काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याला दहशवादमुक्त केले आहे. दहशतवादाविरोधातील भारतीय लष्कराच्या मोहीमेला मिळालेले हे मोठे यश आहे. 

जवानांच्या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला हा पहिलाच जिल्हा असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (23 जानेवारी) बारामुल्लामध्ये तीन दहशवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर भारतीय लष्कराकडून या जिल्ह्याला दहशतवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. बारामुल्ला जिल्ह्याप्रमाणे आता काश्मीर खोरंही दहशवादीमुक्त करण्याचं लक्ष्य भारतीय सैन्याचं आहे. भारतीय सैन्याची ही कामगिरी अभिमानास्पाद असून या कामगिरीसाठी सैन्याला एक सॅल्यूट तर बनतोच.
 

Web Title: A 'salute' to indian Army... After the Baramulla, the mission of the Indian army is 'mission Kashmir'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.