काँग्रेसचा जाहीरनामा सॅम पित्रोदा बनवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:37 PM2017-11-14T22:37:37+5:302017-11-14T22:37:49+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे केवळ गुजरातेतच नव्हे, तर समाजमाध्यमांवरही मोठ्या प्रमाणात स्वत:भोवती वलय कसे निर्माण करू शकले याचे गूढ अखेर उलगडले आहे. समाजमाध्यमांचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणारी नरेंद्र मोदी यांची टीम यामुळे दोन पावले मागे गेली आहे

Sam Pitroda to be made Congress manifesto | काँग्रेसचा जाहीरनामा सॅम पित्रोदा बनवणार

काँग्रेसचा जाहीरनामा सॅम पित्रोदा बनवणार

Next
ठळक मुद्दे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या ओव्हरसीज काँग्रेस विभागाचे शिकागोस्थित अध्यक्ष असलेले सॅम पित्रोदा यांना राहुल गांधी यांनी प्रभावशाली पटेलांवर प्रभाव टाकण्यासाठी मैदानात उतरवले आहे.

 

भाजपचा सोशल मीडिया दोन पावले मागे 
--------------
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे केवळ गुजरातेतच नव्हे, तर समाजमाध्यमांवरही मोठ्या प्रमाणात स्वत:भोवती वलय कसे निर्माण करू शकले याचे गूढ अखेर उलगडले आहे. समाजमाध्यमांचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणारी नरेंद्र मोदी यांची टीम यामुळे दोन पावले मागे गेली आहे. 
गांधी कुटुंबाचे खूप जुने मित्र असलेले व तंत्रज्ञानात व दूरसंचार क्षेत्रात नाव कमावलेले सॅम पित्रोदा हे गुजरात विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राहुल गांधी यांच्या नुकत्याच अमेरिकेत महत्त्वाच्या बर्कले विद्यापीठातील कार्यक्रमासह तेथे अनिवासी भारतीयांच्या गुप्त बैठकांच्या आयोजनामागे पित्रोदा होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी मागे वळून पाहिलेले नाही.
सूत्रांनी दिलेली माहिती विश्वसनीय मानली, तर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या ओव्हरसीज काँग्रेस विभागाचे शिकागोस्थित अध्यक्ष असलेले सॅम पित्रोदा यांना राहुल गांधी यांनी प्रभावशाली पटेलांवर प्रभाव टाकण्यासाठी मैदानात उतरवले आहे. हार्दिक पटेल स्वत: आपल्या पद्धतीने महत्त्वाची भूमिका बजावत आहे; परंतु राहुल गांधी यांनी अधिक प्रगल्भ असे धोरण तयार करण्यासाठी पित्रोदा यांना सक्रिय केले आहे. शिवाय पित्रोदा यांचे गुजरातशी जुने संबंध आहेत. 
पित्रोदा यांचा जन्म ओडिशातील असला तरी त्यांचे आई-वडील गुजरातमधील. पित्रोदा यांनी गुजरातेत शिक्षण घेतले व वडोदरा येथून भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्समधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. नंतर ते उच्चशिक्षणासाठी शिकागोला गेले. राजीव गांधी पंतप्रधान बनल्यानंतर पित्रोदा यांनी देशातील पहिला दूरसंचार आयोग स्थापन करण्यासह अनेक तांत्रिक मोहिमा राबविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. सध्या पित्रोदा हे काँग्रेस पक्षासाठी जाहीरनामा तयार करण्यात व्यस्त आहेत. लवकरच ते गुजरातमधील लोकांचा कल कुठे आहे याचा अदमास घ्यायला किमान पाच ठिकाणचा दौरा करतील. 
राहुल गांधी यांची सोशल मीडिया टीम त्यांच्या तुघलक रस्त्यावरील निवासस्थानापासून दूर ठिकाणी काम करीत आहे. या टीमच्या प्रमुख दिव्या स्पंदना ऊर्फ रम्या आहेत; परंतु पित्रोदा हे त्यांच्या कामावर लक्ष ठेवून आहेत, असे वृत्त आहे. तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेली तुकडी शिकागोत असून, देशातील राजकीय घडामोडींवर बारकाईने नजर ठेवून आहे. या तुकड्या नेमके काय करीत आहेत याची पक्षात कोणाला गंधवार्ताही नव्हती; परंतु पित्रोदा यांचे आगमन होताच सोशल मीडियाचे प्रयत्न हे शिकागोतून चालवले जात असल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या अर्थव्यवस्थेत मागे पडलेल्या विभागांत पुन्हा चैतन्य निर्माण करणे आणि सामाजिक अभिसरण काँग्रेस कसे करणार आहे याचे संकेत जाहीरनाम्यातून मिळतील. पित्रोदा हेदेखील युवकांशी आॅनलाइन जोडले जात आहेत. पित्रोदा यांच्याशी आम्ही दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर लाइव्ह संवाद साधला. त्याला चांगला प्रतिसाद लाभला, असे काँग्रेसच्या सोशल मीडिया व्यवस्थापकाने सांगितले. 
गुजरातमधील ही निवडणूक अत्यंत अटीतटीने लढली जाणार आहे. पित्रोदा अहमदाबाद, वडोदरा, सुरत, राजकोट आणि जामनगर येथे अनेक बैठका घेतील. त्यांच्या समोर या बैठकांसाठी आहेत ते विद्यार्थी आणि व्यावसायिक. राहुल गांधी यांची अनेक भाषणे पित्रोदा यांनी नुकतीच अमेरिकेत अनेक ठिकाणी आयोजित केली होती. अमेरिकेतील गुजराती लोक प्रामुख्याने भाजप व नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहेत व त्यामुळेच पित्रोदा यांनी या लोकांना नजरेसमोर ठेवले आहे. महात्मा गांधी यांच्या मूल्यांचे महत्त्व गुजरातींना असून, याच मूल्यांचा कसा बळी दिला जात आहे ही बाब पित्रोदा यांच्या गुजरातमधील प्रचार दौºयात त्यांना पटवून दिली जाईल. पित्रोदा गुजराती भाषेत गुजरातींना बाहेर पडा व तुमच्या मनातील बोला, असे आवाहन करीत असलेला व्हिडिओ काँग्रेस पक्ष आॅनलाइन पसरवत आहे.
---------------

Web Title: Sam Pitroda to be made Congress manifesto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.