लोकशाही दिनात आत्मदहन करणार जि.प.ची चालढकल : सामरोदच्या शेतकर्‍याचा अतिरिक्त सीईओंना इशारा

By admin | Published: April 21, 2016 11:34 PM2016-04-21T23:34:00+5:302016-04-21T23:34:00+5:30

जळगाव- आपले भूसंपादनाचे पैसे मागील ३० वर्षे मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या सामरोद ता.जामनेर येथील शेतकरी प्रल्हाद ओंकार वंजारी यांनी गुरुवारी सायंकाळी जि.प.त अतिरिक्त सीईओंच्या दालनात येऊन संताप केला. ते म्हणाले, आपण न्यायालयीन लढाई लढत आहोत... न्यायालयाने भरपाई देण्याचा निकाल आपल्या बाजूने दिला, पण जि.प.प्रशासन दिरंगाई करीत आहे... जि.प.चा कुणी वकील न्यायालयात हजर राहत नाही... आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, अशी हताश प्रतिक्रिया देत पुढील लोकशाही दिनात जिल्हाधिकारी, सीईओंसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करील, असा इशारा वंजारी यांनी दिला.

Samadhi's farmer's extra CEO hints at demise of democracy | लोकशाही दिनात आत्मदहन करणार जि.प.ची चालढकल : सामरोदच्या शेतकर्‍याचा अतिरिक्त सीईओंना इशारा

लोकशाही दिनात आत्मदहन करणार जि.प.ची चालढकल : सामरोदच्या शेतकर्‍याचा अतिरिक्त सीईओंना इशारा

Next
गाव- आपले भूसंपादनाचे पैसे मागील ३० वर्षे मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या सामरोद ता.जामनेर येथील शेतकरी प्रल्हाद ओंकार वंजारी यांनी गुरुवारी सायंकाळी जि.प.त अतिरिक्त सीईओंच्या दालनात येऊन संताप केला. ते म्हणाले, आपण न्यायालयीन लढाई लढत आहोत... न्यायालयाने भरपाई देण्याचा निकाल आपल्या बाजूने दिला, पण जि.प.प्रशासन दिरंगाई करीत आहे... जि.प.चा कुणी वकील न्यायालयात हजर राहत नाही... आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, अशी हताश प्रतिक्रिया देत पुढील लोकशाही दिनात जिल्हाधिकारी, सीईओंसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करील, असा इशारा वंजारी यांनी दिला.
या वेळी वंजारी यांचे वकील ॲड.संजयसिंग पाटीलदेखील उपस्थित होते. वंजारी यांची सामरोद येथील जमीन जि.प.च्या लघुसिंचन विभागाने पाझर तलावासाठी संपादित केली. दिवाणी न्यायालयाने या जामिनीसंबंधीचा वाढीव मोबदला संबंधित यंत्रणांनी द्यावा, असे आदेश दिले आहेत. १० ते १२ वर्षे वंजारी हे न्यायालयीन लढाई लढत आहेत.परंतु न्यायालयातील तारखांना जि.प.चे संबंधित अधिकारी, वकील हजर राहत नाहीत. सुमारे चार लाख रुपये मला जि.प.कडून वाढीव मोबदल्यापोटी घ्यायचे आहेत, असे वंजारी पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले.

अभियंत्यांना हजर राहण्याची नोटीस
या प्रकरणात जि.प.चे संबंधित अधिकारी, वकील न्यायालयात उपस्थित राहत नसल्याचा युक्तीवाद लक्षात घेता दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यांनी जि.प. लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी २५ रोजी कामकाजाला हजर राहावे, असे आदेश दिले आहेत. या आदेशांची प्रत ॲड.पाटील यांनी अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांना दाखविली.
त्यावर मस्कर यांनी लागलीच लघुसिंचन विभागातील संबंधितांना आपल्या दालनात सायंकाळी बोलावून या प्रकरणात जि.प.ला काय बाजू मांडायची आहे, काय उत्तर द्यायचे आहे, याची सूचना केली. तसेच वकिलाशीदेखील तातडीने बोलून घ्या, असेही मस्कर यांनी संबंधितांना बजावले.

खुर्ची जप्तीनंतरही दिरंगाई
या प्रकरणात जि.प.च्या लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार खुर्ची जप्तीची कारवाई झाली होती. सहा महिन्यांपूर्वी ही कारवाई झाली, परंतु या प्रकरणात अजूनही लघुसिंचन विभाग चालढकल पद्धतीने कामकाज करीत असल्याचे समोर आले.

Web Title: Samadhi's farmer's extra CEO hints at demise of democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.