"तब्येत खराब आहे, हॉस्पिटलला जातोय असं फोनवर सांगितले अन् भाजपात गेले"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 01:43 PM2022-11-26T13:43:44+5:302022-11-26T13:44:25+5:30

शिवपाल सिंह यादव यांनी भाजपा उमेदवार रघुराज सिंह शाक्यवर यांच्यावर यावेळी हल्लाबोल केला.

Samajwadi Leader Shivpal Singh Yadav criticized BJP in Mainpuri by-election | "तब्येत खराब आहे, हॉस्पिटलला जातोय असं फोनवर सांगितले अन् भाजपात गेले"

"तब्येत खराब आहे, हॉस्पिटलला जातोय असं फोनवर सांगितले अन् भाजपात गेले"

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेशातील जसवंतनगर विधानसभेचे आमदार शिवपाल सिंह यादव सध्या मैनपुरी पोटनिवडणुकीसाठी सपाच्या उमेदवार डिंपल यादव यांच्या प्रचारात व्यस्त आहेत. सुनेसाठी मतं मिळावीत यासाठी ते लोकांमध्ये जात आहेत. शिवपाल सिंह यादव हे चौबिया भागातील राहीन गावात आपल्या समर्थकांसह घरोघरी जाऊन मत देण्याचं आवाहन करत होते. जेव्हा आमच्या घरची सून निवडणुकीच्या मैदानात लढते तेव्हा आम्ही एक झालो. आम्ही तसेच राहू असं मी अखिलेश यादव यांना सांगितल्याचं शिवपाल म्हणाले. 

शिवपाल सिंह यादव यांनी भाजपा उमेदवार रघुराज सिंह शाक्यवर यांच्यावर यावेळी हल्लाबोल केला. शिवपाल सिंह म्हणाले की, सूनेविरोधात रघुराज सिंह निवडणूक लढवतायेत. ते स्वत:ला माझा शिष्य असल्याचं बोलतात. जर खरा शिष्य असता तर आम्हाला सोडून गेला नसता. आमच्या सूनेविरोधात लढायला नको होतं. जर शिष्य असते तर आमच्यासोबतच राहायला हवं होते. न सांगता गेले, मला सांगून जायला हवं होतं. ते तर गुपचूप भाजपामध्ये गेले असं त्यांनी म्हटलं. 

तसेच जेव्हा मी रघुराजला फोन केला होता तेव्हा त्याने सांगितले, माझी तब्येत खराब आहे. टेस्ट करायला चाललोय. मी म्हटलं लोहिया हॉस्पिटलमध्ये माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत. त्यांना फोन करतो सांगितले होते. त्यानंतर मला कळालं ते हॉस्पिटलला गेले नव्हते. दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीत गेले. जर शिष्य होता तर मला सोडून गेला नसता. तू माझा शिष्य, दास कुणीही नाही. आम्ही रघुराजला खासदार बनवलं, नोकरीही लावली. त्याने आमचा विश्वासघात केला. न सांगता भाजपात गेला असं शिवपाल सिंह यादव यांनी आरोप केला. 

दरम्यान, सून डिंपलने मला फोन केला, काका आपण निवडणूक लढवूया, आपल्याला एकत्र राहायचं आहे. आम्हीही म्हटलं, तुम्हाला आमचे साक्षीदार व्हावं लागेल. अखिलेश याने गडबड केली तर आमच्यासोबत राहा. सून म्हणाली - नाही बरं होईल. आता आणखी एक-दोन निवडणुका लढू, मग फक्त मुलं लढणार, त्यामुळे आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. नेताजींच्या अनुपस्थितीत आमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, म्हणून आम्ही हात जोडून विनंती करतो, आजपासून सर्वांनी सहभागी व्हा, जास्तीत जास्त मते देऊन डिंपलला विजयी करायचं आहे असं आवाहन शिवपाल सिंह यादव यांनी केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Samajwadi Leader Shivpal Singh Yadav criticized BJP in Mainpuri by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.