Dimple Yadav : आता डिंपल यादव निवडणुकीच्या मैदानात उतरणार? अखिलेश यादवांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, सुत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 04:19 PM2022-03-23T16:19:45+5:302022-03-23T16:20:57+5:30

Dimple Yadav : आझमगड या जागेवर सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणार असून, त्याबाबत समाजवादी पार्टीमध्ये विचारमंथन सुरू आहे.

samajwadi party chief akhilesh yadav to field wife dimple yadav from azamgarh lok sabha seat in bypolls says sources | Dimple Yadav : आता डिंपल यादव निवडणुकीच्या मैदानात उतरणार? अखिलेश यादवांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, सुत्रांची माहिती

Dimple Yadav : आता डिंपल यादव निवडणुकीच्या मैदानात उतरणार? अखिलेश यादवांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, सुत्रांची माहिती

Next

आझमगड : उत्तर प्रदेशच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी येत आहे. आझमगड लोकसभा मतदारसंघातून (Azamgarh Lok Sabha Seat) समाजवादी पार्टी (Samajwadi Party) डिंपल यादव (Dimple Yadav) यांना उमेदवारी देऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या जागेवरून खासदार असलेले अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मंगळवारी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, जो आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वीकारला आहे.

आता आझमगड या जागेवर सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणार असून, त्याबाबत समाजवादी पार्टीमध्ये विचारमंथन सुरू आहे. दरम्यान, याआधी 21 मार्चला आझमगडमध्ये पोहोचलेल्या अखिलेश यादव यांनी तेथील आमदार आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती, त्यानंतरच त्यांनी करहल मतदारसंघातून आमदारकी कायम ठेवत आझमगड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमदारांनी डिंपल यादव यांना आझमगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत सहमती दर्शवली होती. या नेत्यांच्या सांगण्यानुसार अखिलेश यादव यांनी लोकसभेची जागा सोडली. आता अखिलेश यादव हे डिंपल यादव यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

अखिलेश यादव यांनी दिला खासदारकीचा राजीनामा
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काल (मंगळवारी) लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशातील आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव हे मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीत करहल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांचा  67,504 मतांच्या फरकाने पराभव केला. अखिलेश यादव यांना 1,48,196 मते मिळाली, तर एसपी सिंह बघेल यांना 80,692 मते मिळाली.

विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दुसऱ्यांदा जबरदस्त बहुमत मिळवून सत्तेत परतला आहे. भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. बसपा 1, काँग्रेस आणि जनसत्ता दलाच्या उमेदवारांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या आहेत. 2017 मध्ये समाजवादी पक्षाने 52 जागा जिंकल्या होत्या.

Web Title: samajwadi party chief akhilesh yadav to field wife dimple yadav from azamgarh lok sabha seat in bypolls says sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.