Petrol Diesel Price Hike Jaya Bachchan : "यांना कोणी जिंकवून आणलंय..." पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर जया बच्चन यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 02:53 PM2022-03-22T14:53:33+5:302022-03-22T14:56:10+5:30

Petrol Diesel Price Hike Jaya Bachchan : अखिलेश यादव तर यापूर्वीच सतर्क राहण्यास सांगत होते, जया बच्चन यांची प्रतिक्रिया.

samajwadi party jaya bachchan got angry over increase in prices petrol diesel gas cylinder said who has brought them by winning | Petrol Diesel Price Hike Jaya Bachchan : "यांना कोणी जिंकवून आणलंय..." पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर जया बच्चन यांचा संताप

Petrol Diesel Price Hike Jaya Bachchan : "यांना कोणी जिंकवून आणलंय..." पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर जया बच्चन यांचा संताप

Next

Petrol Diesel Price Hike Jaya Bachchan : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Hike) तब्बल चार महिन्यांनंतर वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८० पैशांची वाढ झाली. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल दर ८७.४७ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. दरम्यान, यावर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी दरवाढीवरून संताप व्यक्त केला. तसंच अखिलेश यादव यापूर्वी सतर्क राहा असं सांगत होते, असंही त्या म्हणाल्या.

"हे सरकार अशाच प्रकारे करतं. अखिलेश यादव यांनी आपल्या कॅम्पेनदरम्यान सातत्यानं सतर्क केलं होतं. निवडणुका झाल्यावर दरवाढ होईल, असं सांगितलं होतं. मत देऊन यांना माहित नाही कोणी निवडून आणलं, जनतेनं तर नक्कीच आणलं नसेल," असं म्हणत जया बच्चन यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.  


"१५ वर्षांपासून आपण महिलांच्या सुरक्षेसाठी काम करत आहोत. महिला सुरक्षेबाबत योगी सरकारचा दावा पोकळ आहे. जेव्हापासून भाजप सरकार सत्ते आलंय, तेव्हापासून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. भाजप केवळ शहरं आणि रेल्वे स्थानकांचीच नावं बदलण्याचं काम करत आहे," असंही त्या म्हणाल्या.

अखिलेश यादवांकडूनही टीका
सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीदेखील भाजपवर टीका केली. "भाजपनं जनतेला महागाईचं आणखी एक भेट दिली आहे. लखनौमध्ये गॅस सिलिंडर १ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे.  पाटण्यातही १ हजार रुपयांच्या पुढे गेलाय. निवडणुका संपल्या, महागाई सुरू," असं ट्वीट अखिलेश यादव यांनी केलं आहे.

Web Title: samajwadi party jaya bachchan got angry over increase in prices petrol diesel gas cylinder said who has brought them by winning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.