समाजवादी पक्षाचा नेता राम मंदिर निर्माणासाठी देणार 15 कोटी

By Admin | Published: May 15, 2017 12:24 PM2017-05-15T12:24:35+5:302017-05-15T12:24:35+5:30

अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी समाजवादी पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदारानं 15 कोटी देण्याची घोषणा केली आहे.

Samajwadi Party leader will give Rs 15 crore for Ram temple construction | समाजवादी पक्षाचा नेता राम मंदिर निर्माणासाठी देणार 15 कोटी

समाजवादी पक्षाचा नेता राम मंदिर निर्माणासाठी देणार 15 कोटी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
उत्तर प्रदेश, दि. 15 - अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी समाजवादी पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदारानं 15 कोटी देण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते बुक्कल नवाब यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी 15 कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. बुक्कल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

सरकारकडून जेव्हा माझ्या जमिनीचा मोबदला मिळेल, त्यावेळी त्यातील 15 कोटी रुपये हे अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी मी दान करेन, असंही बुक्कल यांनी सांगितलं आहे. तसेच राम मंदिर निर्माणाला त्यांनी समर्थनही दिलं आहे. नवाब म्हणाले, भगवान रामाचं मंदिर कोणत्याही परिस्थितीत अयोध्येमध्ये बनले पाहिजे. भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला होता. त्यामुळेच त्यांचं मंदिर अयोध्येत बनवलं पाहिजे. नवाब यांनी काही दिवसांपूर्वीच राम मंदिर बनल्यानंतर मूर्तीवरील मुकुट देणार असल्याचे जाहीर केलं होतं. तसेच 10 लाख रुपयेही देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 10 लाख रुपये आणि मुकुट यात 15 कोटी रुपयांचा समावेश नसेल, 15 कोटी रुपये वेगळे देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

बुक्कल म्हणाले, मला सरकारकडून अजून 30 कोटी रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. माझ्या जमिनीचा वापर सरकारने गोमती रिव्हरफ्रंटसाठी केला आहे. मात्र सरकारनं अद्यापही त्याचा मोबदला मला दिला नाही. ज्यावेळी सरकार माझ्या जमिनीचा मोबदला देईल, त्यावेळी मी त्यातील 50 टक्के रक्कम राम मंदिराच्या निर्माणासाठी दान करेल, असंही ते म्हणाले आहेत. 
 

Web Title: Samajwadi Party leader will give Rs 15 crore for Ram temple construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.