योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात शुभावती शुक्ला निवडणुकीच्या मैदानात, सपा उमेदवारांची नवीन यादी जाहीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 07:08 PM2022-02-07T19:08:27+5:302022-02-07T19:10:01+5:30
Uttar Pradesh Assembly Elections 2022 : आझमगडच्या मुबारकपूर मतदारसंघातून अखिलेश यादव यांना तिकीट देण्यात आले आहे. अखिलेश यादव यांनी 2017 मध्येही याच जागेवरून निवडणूक लढवली होती.
लखनऊ : समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मंगळवारी आगामी विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Elections 2022) 24 उमेदवारांची नवीन यादी (SP Candidate New List) जाहीर केली. या यादीत भाजपचे माजी उमेदवार दिवंगत उपेंद्र दत्त शुक्ला यांच्या पत्नी शुभावती शुक्ला (Shubhawati Shukla) यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या विरोधात गोरखपूर सदर मतदारसंघातून (Gorakhpur Sadar Seat) उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय, आझमगडच्या मुबारकपूर मतदारसंघातून अखिलेश यादव यांना तिकीट देण्यात आले आहे. अखिलेश यादव यांनी 2017 मध्येही याच जागेवरून निवडणूक लढवली होती. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या नावामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी त्यांचा संबंध नाही. समाजवादी पार्टीच्या नव्या यादीत पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात शुभवती शुक्ला यांना तिकीट देण्यात आले आहे.
दरम्यान, दिवंगत उपेंद्र दत्त शुक्ला यांच्या कुटुंबाने काही दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. उपेंद्र दत्त शुक्ला यांची पत्नी शुभवती शुक्ला यांच्यासोबत अरविंद शुक्ला आणि अमित शुक्ला हे देखील समाजवादी पार्टीमध्ये सामील झाले आहेत. आता समाजवादी पार्टीने त्यांना योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. याशिवाय, बलिया येथून नारद राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सात टप्प्यात विधानसभा निवडणूक
दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.
...यांना मिळाली उमेदवारी
विश्वनाथगंज : सौरभ सिंग
राणीगंज : आरके वर्मा
फाफामऊ : अन्सार अहमद
मेहनौन: नंदिता शुक्ला
तरबगंज : रामभजन चौबे
मनकापूर : रमेशचंद्र गौतम
गौरा : संजय कुमार
हर्रेया : त्र्यंबक पाठक
मेहंदावळ : जयराम पांडे
खलीलाबाद : अब्दुल कलाम
नौतनवा: कौशल सिंग
सिसवां : शुशील टेबरीवाल
पनियरा : कृष्णभान सिंह सैंथवार
गोरखपूर सदर : शुभवती शुक्ला
पदरौना: विक्रम यादव
रुद्रपूर : प्रदीप यादव
सगडी : एच.एन.पटेल
मुबारकपूर : अखिलेश यादव
मोहम्मदाबाद गोहना : वैजनाथ पासवान
बलिया नगर : नारद राय
मडियाहूं : सुषमा पटेल
वाराणसी दक्षिण : किशन दीक्षित
सेवापुरी : सुरेंद्रसिंग पटेल
छानबे : कीर्ती कोल