कोणी पत्ते खेळतंय तर कोणी तंबाखू मळतंय; भाजपा आमदारांचे विधानसभेतील 'ते' Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 02:41 PM2022-09-28T14:41:38+5:302022-09-28T14:50:51+5:30

जनतेच्या विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना एक आमदार मोबाईलवर पत्ते खेळताना तर दुसरे महाशय तंबाखू मळताना पाहायला मिळत आहे.

samajwadi party share video of up bjp mla chewing tobacco and playing mobile game in assembly session | कोणी पत्ते खेळतंय तर कोणी तंबाखू मळतंय; भाजपा आमदारांचे विधानसभेतील 'ते' Video व्हायरल

फोटो - NBT

Next

उत्तर प्रदेश पावसाळी अधिवेशनातील आमदारांचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. जनतेच्या विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना एक आमदार मोबाईलवर पत्ते खेळताना तर दुसरे महाशय तंबाखू मळताना पाहायला मिळत आहे. हे व्हिडीओ व्हायरल होताच या आमदारांवर निशाणा साधण्यात आला आहे. तसेच सपाने यावरून गंभीर आरोप करत हे व्हि़डीओ शेअर केले आहे. सध्या या याची तुफान चर्चा रंगली आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये भाजपा आमदार राकेश गोस्वामी मोबाईलवर तीनपत्ती खेळताना दिसत आहेत आणि झाशीमधील आमदार रवी शर्मा तंबाखू मळताना दिसत आहेत. कोणीतरी हे व्हिडीओ शूट करून ते इंटरनेटवर व्हायरल केले आहेत. सपाच्या अखिलेश यादव यांनी हे दोन्ही व्हिडीओ शेअर देखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. 

भाजपा आमदारांनीच हा व्हिडीओ शूट केल्याचा दावा करण्यात येत आहे.  या व्हायरल व्हिडीओवर भाजपा आमदारांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. "तंबाखू खाणं आरोग्याला अपायकारक आहे. कदाचित हा संदेश देण्यासाठी भाजपाच्या एका आमदाराने आपल्याच आमदाराचा व्हिडीओ जनहितार्थ प्रसिद्ध केला असेल, त्याचेही आभार! भाजपा अंतर्गत सुधारणांच्या मार्गावर आहे… आणि त्याला त्याची नितांत गरजही आहे" असं म्हणत अखिलेश यादव यांनी खोचक टोला लगावला आहे. 


 

Web Title: samajwadi party share video of up bjp mla chewing tobacco and playing mobile game in assembly session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.