दे दणादण! सपा कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथा-बुक्क्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 03:56 PM2023-07-21T15:56:33+5:302023-07-21T16:03:52+5:30
वाढदिवस साजरा करताना सपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशातील बांदा येथे सपाचे माजी मंत्री विशम्भर निषाद यांचा वाढदिवस साजरा करताना सपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे.
सपाच्या जिल्हा सचिवांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दुसरीकडे जिल्हाध्यक्ष मधुसूदन कुशवाह म्हणाले की, या सर्व विरोधकांनी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. एसपी ऑफिसमध्ये काही घडले नाही, ते फक्त आपापसात कमेंट करत होते, बाहेर काय झालं याची माहिती नाही.
कोतवाली बिजली खेडा येथे बांधण्यात आलेल्या एसपी कार्यालयाबाहेर ही घटना घडली आहे. जिथे 18 जुलै रोजी सपाचे विशम्भर निषाद यांचा वाढदिवस होता, ज्यामध्ये सर्व कार्यकर्ते एकत्र आले होते. सपाचे वीरेंद्र यांनी वाढदिवसानिमित्त कार्यालयातून बाहेर पडतानाच मोहन साहू यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम्हाला पराभूत करण्याचे काम केले आहे, असे सांगून त्यांच्या सहकाऱ्यांसोबत हुल्लडबाजी सुरू केली, याच दरम्यान समर्थकांनी कार्यालयाबाहेर गोंधळ घातला, धक्काबुक्की, हाणामारी सुरू केल्याचा आरोप केला.
उपस्थित एसपीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी प्रकरण मिटवून त्यांना घरी पाठवले. खिशात असलेले 3500 रुपयेही काढून घेतल्याचा आरोप वीरेंद्रने केला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यासोबतच ही घटना एसपी ऑफिसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.