एअर स्ट्राईकचे रणनीतीकार सामंत गोयल यांची 'रॉ'च्या प्रमुखपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:19 PM2019-06-26T14:19:38+5:302019-06-26T14:19:38+5:30
पंजाब कॅडरमधील आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांनी बालकोट एअर स्टाईकची पूर्ण योजना आखली होती. सामंत गोयल हे विद्यमान रॉ चे प्रमुख अनिल कुमार धस्माना यांच्याकडून पदभार स्वीकारतील
नवी दिल्ली- केंद्र सरकारने 1984 बॅचचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांना रॉ (RAW) चे प्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. त्याचसोबत आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांची गुप्तचर संस्थेच्या संचालकपदावर नियुक्ती केली आहे.
पंजाब कॅडरमधील आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांनी बालकोट एअर स्टाईकची पूर्ण योजना आखली होती. सामंत गोयल हे विद्यमान रॉ चे प्रमुख अनिल कुमार धस्माना यांच्याकडून पदभार स्वीकारतील. धस्माना निवृत्त होत आहेत. 1990 च्या दशकात पंजाबमध्ये उग्रवाद्यांनी दहशत माजवली होती त्याच्याविरोधात सामंत गोयल यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु केलं होतं.
तर दुसरीकडे गुप्तचर संस्थेचे नवनियुक्त संचालक अरविंद कुमार हे काश्मीर प्रश्नाचे अभ्यासक आहेत. सध्या ते काश्मीर प्रकरणातील विभागातील विशेष सचिव म्हणून काम पाहतात. सामंत गोयल यांच्याप्रमाणे अरविंद कुमार हे 1984 बॅचमधील आसाम-मेघालय कॅडरमधील आयपीएस अधिकारी आहेत.