कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 07:27 PM2020-06-17T19:27:50+5:302020-06-17T19:53:46+5:30
India China FaceOff : भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत.
समस्तीपूर : लडाखच्या गलवान खोऱ्यात एलएसी सीमेववर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये 16 बिहार रेजिमेंटचे जवान अमन कुमार सिंह सुद्धा होते. अमन कुमार सिंह हे समस्तीपूर जिल्ह्यातील मोहिउद्दीननगर ब्लॉकमधील सुलतानपूर पूर्व गावचे रहिवासी होते.
मंगळवारी रात्री नऊ वाजता मोबाईलवरून लडाख येथे आपल्या मुलाने देशासाठी बलिदान दिले, अशी माहिती शहीद अमन कुमार सिंह यांचे वडील सुधीर सिंह यांना कमांडिंग ऑफिसरने दिली. त्यानंतर त्यांच्या गावात शोककळा पसरली. नोव्हेंबर २०१४ मध्ये अमन कुमार सिंह हे बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. गेल्या 3 महिन्यांपासून ते लेह-लडाखमधील चीन सीमेजवळ तैनात होते.
गेल्या वर्षी पटनामध्ये अमन कुमार सिंह यांचे लग्न झाले होते. ते शहीद झाल्याची बातमी ऐकून त्यांच्या पत्नी अस्वस्थ झाल्या असून त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. अमन कुमार सिंह यांच्या आईलाही अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, "25-25 फेब्रुवारी ड्युटीवर गेला आणि तो म्हणाला होता की, तीन महिन्यानंतर सुट्टी भेटेल, पण कोरोनामुळे ट्रेन बंद झाली. लडाखमध्ये माझा मुलगा शहीद झाला. तीन महिन्यांत कशावरून काय झाले?"
रात्री दारात बसलो होतो, त्याचवेळी मोबाईलवर कॉल आला. त्यावेळी विचारले की तुम्ही अमनचे वडील आहात का?, यावर मी हो असे उत्तर दिले आणि त्यांच्याकडून मला सांगण्यात आले की, अमन देशासाठी शहीद झाला, असे अमन कुमार सिंह यांचे वडील सुधीर कुमार सिंह यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले, "माझा मुलगा देशासाठी शहीद झाला आहे, यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते?"
दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे.
आणखी बातम्या...
India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...
India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह
दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव
ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास शिक्षा होणार नाही? रेल्वे अनेक तरतुदी हटविण्याच्या तयारीत
21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...