संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 04:23 PM2024-11-24T16:23:14+5:302024-11-24T16:24:00+5:30
Sambhal Violence: उत्तर प्रदेशमधील संभल येथे जामा मशिदीच्या सर्व्हेदरम्यान झालेल्या वादाला हिंसळ वळण लागलं असून, यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
उत्तर प्रदेशमधील संभल येथे जामा मशिदीच्या सर्व्हेदरम्यान झालेल्या वादाला हिंसळ वळण लागलं असून, यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
शनिवारी सकाळी कोर्टाच्या आदेशानुसार मशिदीचा सव्हे करण्यासाठी पथक जेव्हा दाखल झालं तेव्हा स्थानिकांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी हिंसक जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या गोळ्यांचा मारा केला. यामदरम्यान, हिंसक आंदोलकांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली. या घटनेत पोलीस अधीक्षकांसह अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले.
संभजमधील घटनेबाबत पोलीस एसपी कृष्ण कुमार यांनी सांगितले की, दगडफेक करणाऱ्या जमावाने पोलिसांची वाहनं जाळून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आता या आंदोलकांविरोधात एनएसए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. या संपूर्ण हिंसाचाराचं ड्रोनद्वारे चित्रिकरण करण्यात आलं आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही आरोपींची ओळख पटवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.