राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची मुक्तता करू जाहीरनाम्यांत अद्रमुक, द्रमुकची ‘समान' आश्वासने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 05:39 AM2019-03-20T05:39:00+5:302019-03-20T05:39:19+5:30
केंद्रात सत्तेत आल्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची मानवतेच्या दृष्टिकोनातून मुक्तता करण्याचे, तसेच वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट रद्द करण्याचे आश्वासन अण्णा द्रमुक व द्रमुक यांनी जाहीरनाम्यांमध्ये दिले आहे.
चेन्नई : केंद्रात सत्तेत आल्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची मानवतेच्या दृष्टिकोनातून मुक्तता करण्याचे, तसेच वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट रद्द करण्याचे आश्वासन अण्णा द्रमुक व द्रमुक यांनी जाहीरनाम्यांमध्ये दिले आहे.
खासगी क्षेत्रामध्ये राखीव जागा धोरण लागू करण्याचे आश्वासन द्रमुक पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. नीट परीक्षेला तामिळनाडूतील सर्वच राजकीय पक्षांनी या आधी जोरदार विरोध केला आहे. त्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी निदर्शनेही केली होती.
गरिबी निर्मूलन योजना राबवू
केंद्रात सत्ता मिळाल्यास राष्ट्रीय गरिबी निर्मूलन योजना राबविण्याचा विचार आहे, असे अण्णा द्रमुकने जाहीरनाम्यात म्हटले. (वृत्तसंस्था)