विमानात 'सॅमसंग गॅलेक्सी नोट 7'च्या वापरावर बंदी
By Admin | Published: September 9, 2016 07:20 PM2016-09-09T19:20:13+5:302016-09-09T22:37:13+5:30
विमान प्रवासात सॅमसंग गॅलेक्सी नोट सेव्हन या स्मार्टफोनच्या वापरावर भारत सरकारने बंदी आणली आहे.
प्रवाशांना हा फोन हँडबॅगमध्येच ठेवता येईल व संपूर्ण प्रवासभर तो बंद (स्वीचड् आॅफ) करून ठेवावा लागेल, अशी माहिती नागरी उड्डयन विभागाचे महासंचालक बी. एस.भुल्लर यांनी दिली. विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा आदेश ताबडतोब लागू करण्यात आल्याचे भुल्लर म्हणाले.
सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 या फोनच्या बॅटरीमध्ये त्रुटी असल्याचं समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच सॅमसंग कंपनीने जगभरातून नोट 7 हे फोन परत मागवले आहेत. तसेच कंपनीने या फोनची विक्री सुद्धा थांबवली आहे. अमेरिकेच्या फेडरल अॅव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने या संदर्भात गुरूवारी आदेश दिल्यानंतर लगेचच भारतानेही वरील आदेश जारी केला.
या फोनबाबात नुकत्याच घडलेल्या काही घटना आणि सॅमसंगने कंपनीने गॅलॅक्सी नोट सेव्हन फोनबद्दल व्यक्त केलेल्या काळजीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल अॅव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने प्रवाशांना विमानात हा फोन सुरू करू नये किंवा तो चार्जिंगला लावू नये , तसेच तपासणी झालेल्या बॅगांमध्ये त्यांना ठेवू नये, असे अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे.