सॅमसंगची ऍपल कंपनीला टक्कर, गॅलक्सी एस 7, एस 7 एज मोबाईलच्या विक्रीत वाढ
By admin | Published: April 8, 2016 03:24 PM2016-04-08T15:24:38+5:302016-04-08T15:33:55+5:30
सॅमसंगच्या गॅलक्सी एस 7, गॅलक्सी एस 7 एज या मोबाईलला भारतात लाँच झाल्यापासून चांगलंच मार्केट मिळतं आहे.
ऑनलाइन लोकमत-
नवी दिल्ली, दि. ८- आयफोन म्हटलं सगळ्यांची पावलं आपसुकच ऍपलकडे वळतात. मात्र ऍपलला सॅमसंगच्या स्वरूपात आत तगडा प्रतिस्पर्धी निर्माण झाला आहे. सॅमसंगच्या गॅलक्सी एस 7, गॅलक्सी एस 7 एज या मोबाईलला भारतात लाँच झाल्यापासून चांगलंच मार्केट मिळतं आहे. सॅमसंग एस 7 या मॉडलच्या जवळपास 60 हजार मोबाईलची आतापर्यंत विक्री झाल्याचं रिटेल मार्केटच्या सर्व्हेतून समोर आलं आहे. या मोबाईलचा प्रोसेसर सॅमसंगच्या एस 6 सारखाचं आहे. सॅमसंगच्या एस 7 आणि एस 7 एज या मोबाईलला एप्रिल ते जून या तीन महिन्यांत चांगली मागणी राहणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत या मोबाईलची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचं समोर आलं आहे. प्रतिस्पर्धी मोबाईल कंपन्यांना नामोहरम करण्यासाठी या मोबाईलची स्क्रीन छोटी ठेवण्यात आली आहे. सॅमसंगच्या एस 7 या सीरिजला येत्या काळात चांगली मागणी मिळेल. त्यामुळे सॅमसंग कंपनीची बाजारात ताकद वाढवण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट फोनच्या मार्केटमध्ये सॅमसंग चांगली प्रतिमा निर्माण करेल, असा विश्वास मोबाईल रिसर्चर तरुण पाठक यांनी व्यक्त केला आहे. सॅमसंगनं गॅलक्सी एस 7 या मोबाईलला गेल्या दोन आठवड्यांत मिळालेल्या मागणीनुसार सॅमसंगनं गॅलक्सी एस 7 या सीरिजचं 65 टक्के उत्पादन वाढवलं पाहिजे, असं मत मोबाईल जाणकारांनी व्यक्त केलं आहे. गॅलक्सीच्या एस 6च्या गेल्या वर्षीच्या तुलनेत एस 7चं उत्पादन वाढवलं आहे. त्यामुळे हा मोबाईल आता लोकांच्या चांगला पसंतीत उतरला आहे.