तामिळनाडूत जलिकट्टू विधेयकाला मंजुरी

By Admin | Published: January 23, 2017 06:26 PM2017-01-23T18:26:59+5:302017-01-23T18:38:47+5:30

तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात जलिकट्टू विधेयकाला सोमवारी मंजुरी देण्यात आली.

Sanctioning of Tamil Nadu Jaliktu Bill | तामिळनाडूत जलिकट्टू विधेयकाला मंजुरी

तामिळनाडूत जलिकट्टू विधेयकाला मंजुरी

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 23 - तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात जलिकट्टू विधेयकाला सोमवारी मंजुरी देण्यात आली. 
 
तामिळनाडूनमध्ये अनेक ठिकाणी जलिकट्टूच्या समर्थनासाठी आंदोलन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर जलिकट्टू विधेयकासाठी येथील विधानसभेत विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. या अधिवेशनाच्या विशेष सत्रात अवघ्या काही मिनिटातचं जलिकट्टू विधेयकाला एकमताने मंजूरी देण्यात आली. 
 
तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गेल्या शनिवारी जलिकट्टू अध्यादेशाला मंजूरी दिली होती. दरम्यान, जलिकट्टू खेळावरील बंदी हटविण्यात आल्यानंतर सुद्धा चेन्नई येथील मरीना बीचवर आंदोलकांनी ठाण मांडला होता. तसेच, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले.  
 

Web Title: Sanctioning of Tamil Nadu Jaliktu Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.