वाळू लिलावाला थंड प्रतिसाद

By admin | Published: February 2, 2015 11:52 PM2015-02-02T23:52:58+5:302015-02-02T23:52:58+5:30

जिल्‘ातील १३९ वाळू भुखंडापैकी फक्त ३९ भुखंडावर लिलावात बोली

Sand auction cold response | वाळू लिलावाला थंड प्रतिसाद

वाळू लिलावाला थंड प्रतिसाद

Next
ल्‘ातील १३९ वाळू भुखंडापैकी फक्त ३९ भुखंडावर लिलावात बोली
पुणे: जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या वाळू लिलावाला अत्यंत थंड प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातील १३९ वाळू भूखंडा पैकी केवळ ३९ भूखंडासाठी ई-ऑक्शन पध्दतीने बोली लावण्यात आली आहे.
वाळू लिलावातील गैरप्रकार, मिलीभगत आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचा शिरकाव रोखण्यासाठी गत वर्षापासून ई-ऑक्शन पद्धतीने ऑनलाईन लिलाव सुरु झाले आहे. जिल्‘ा प्रशासनाने लिलावा १३९ भूखंडाची यादी जाहिर केली होते. परंतु वाळू ठेकेदांना ज्या भुखंडातून अधिक वाळू मिळेल अशा ३९ भुखंडावर ६५ जणांनी ऑन लाईन बोली लावली. एकाच भूखंडावार एका पेक्षा अधिक लोकांना बोली लावण्यासाठी रविवारी सायंकाळनंतर खास वेळ देण्यात आली होती. परंतु सांयकाळी पाच नंतर बराच वेळ ई-ऑक्शनचे संकेतस्थळ हॅग झाले होते. यामुळे अनेकांना वाळू लिलावासाठी बोली लावता आली नसल्याची तक्रार काही ठेकेदारांनी केली. यामुळे सोमावरी संकाळी पुन्हा अर्धा तास बोली लावण्यासाठी संकेतस्थळ खुले करण्यात आले होते. गत वर्षी वाळू लिलावातून जिल्हा प्रशासनाला सुमारे ९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
जिल्हा प्रशासनाने रितसर पध्दतीने वाळू लिलाव जाहीर करुन देखील अनेक ठेकदारांनी याकडे पाठ फिरावली आहे. परंतु लिलावात सहभाग न घेता देखील जिल्ह्यात प्रामुख्याने दौंड, इंदापूर, पुरंदर आणि शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सरास अनधिकृत पणे वाळू उपसा सुरु आहे. अनधिकृतपणे वाळू उपसा करणा-या ठेकेदारावर कडक कारवाई केल्यास जिल्हा प्रशासनाच्या वाळू लिलावास प्रतिसाद मिळू शकतो.

Web Title: Sand auction cold response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.