वाळू, विटा विक्रेत्यांनी गिळला रस्ता मनपाचेही अतिक्रमण: प्रचंड रहदारी तरीही दुर्लक्ष कायम

By Admin | Published: July 27, 2016 07:18 PM2016-07-27T19:18:50+5:302016-07-27T19:18:50+5:30

जळगाव : आयटीआय ते आकाशवाणी चौक या भागात दिवसभर प्रचंड रहदारी असते. त्यातच बहिणाबाई उद्यानाच्या मागील समांतर रस्त्याच्या जागेत वाळू माफीयांनी मोठ्या प्रमाणात समांतर रस्ता बळकावला आहे. याबाबत वारंवार तक्रारी होऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याच्या परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.

Sand, bricks and vendors encroached on the road: The tremendous traffic still neglected | वाळू, विटा विक्रेत्यांनी गिळला रस्ता मनपाचेही अतिक्रमण: प्रचंड रहदारी तरीही दुर्लक्ष कायम

वाळू, विटा विक्रेत्यांनी गिळला रस्ता मनपाचेही अतिक्रमण: प्रचंड रहदारी तरीही दुर्लक्ष कायम

googlenewsNext
गाव : आयटीआय ते आकाशवाणी चौक या भागात दिवसभर प्रचंड रहदारी असते. त्यातच बहिणाबाई उद्यानाच्या मागील समांतर रस्त्याच्या जागेत वाळू माफीयांनी मोठ्या प्रमाणात समांतर रस्ता बळकावला आहे. याबाबत वारंवार तक्रारी होऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याच्या परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.
आयटीआय व मुलींचे आयटीआयच्या भिंतीला लागूनच मोठे अतिक्रमण आहे. यातील बरीचशी जागा मनपाने सागरपार्कवरील हॉकर्सला दिली आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. पुढे बहिणाबाई उद्यानाच्या मागे समांतर रस्त्यावर अतिक्रमण करण्यात जणू स्पर्धा सुरू असल्याचीच प्रचिती येते. महामार्गाच्या दोन्ही बाजूने ही परिस्थिती दिसून येते. टपर्‍या, खाद्य पदार्थांच्या गाड्यांचा महामार्गाला वेढा असल्याचीच प्रचिती या भागात येते. बहिणाबाई उद्यानाच्या पुढील हॉकर्सला मागच्या बाजुने जागा देण्यात आली आहे. त्याच्याच पुढे वाळू, विटा, खडी विके्रत्यांनी मोठा रस्ता बळकावला असल्याचे लक्षात येते. केवळ टपर्‍याच नाही तर या मंडळींची ट्रक, डंपर,ट्रॅक्टर तसेच वाळू, विटा, खडीचे ढीग या ठिंकाणी लावून रस्ता बळकावला असल्याचे लक्षात येते. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी सतत असते.
-----
धोकादायक प्रकार
ब्रुकबॉण्ड कॉलनीच्या मागील बाजूने रिंगरोडकडून अनेक जण महामार्गाकडे येत असतात. अग्रवाल हॉस्पिटलजवळ चार रस्ते एकत्र येतात. एक बहिणाबाई उद्याकडून, दुसरा रिंगरोडकडून तिसरा महामार्ग एक रस्ता मु.जे. महाविद्यालयाकडून येतो. या ठिकाणी मोठमोठे गतिरोधक असल्याने वाहने हळू होतात मात्र एकमेकांच्या पुढे जाण्याची कसरत या ठिंकाणी नेहमी सुरू असते. त्यामुळे बर्‍याच वेळेस अपघात होतात. या भागातील समांतर काही ठिकाणी आहे. तो दुरुस्त करून त्यावरून रहदारी वळविल्यास महामार्गावरील गर्दी कमी होऊ शकते. अशीच परिस्थिती प्रभात चौकाकडून गणपती हॉस्पिटलकडे जाणार्‍या रस्त्याचीही आहे. तेथेही समांतर रस्ता चांगला आहे. तो थेट पुढे आकाशवाणी चौकाकडे येतो. तेथून रहदारीही बर्‍यापैकी आहे. मात्र रस्ता खराब झाला आहे. त्याची डागडुजी केली गेल्यास तेथून वाहने जाऊ शकतील.

Web Title: Sand, bricks and vendors encroached on the road: The tremendous traffic still neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.