वाळू व्यावसायिक अजय बढेची कारागृहात रवानगी

By Admin | Published: July 16, 2016 10:37 PM2016-07-16T22:37:02+5:302016-07-16T22:37:02+5:30

जळगाव : शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचार्‍याच्या अंगावर वाळूचे डंपर घातल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील संशयित आरोपी तथा वाळू व्यावसायिक अजय भागवत बढे (वय ३७, रा. के.सी. पार्क, कानळदा रोड, जळगाव) याची शनिवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात रवानगी केली.

Sand Professional Ajay to be sent to jail | वाळू व्यावसायिक अजय बढेची कारागृहात रवानगी

वाळू व्यावसायिक अजय बढेची कारागृहात रवानगी

googlenewsNext
गाव : शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचार्‍याच्या अंगावर वाळूचे डंपर घातल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील संशयित आरोपी तथा वाळू व्यावसायिक अजय भागवत बढे (वय ३७, रा. के.सी. पार्क, कानळदा रोड, जळगाव) याची शनिवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात रवानगी केली.
शहर पोलिसांनी १३ जुलैला दुपारी १२.३० वाजता अजय बढेला अटक केली होती. अटकेनंतर त्याला न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.राजेश गवई यांनी तर संशयितातर्फे ॲड.सागर चौधरी यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Sand Professional Ajay to be sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.