घरकूलसाठी माळशिरसवरून आणली वाळू स्थायी सभा : 14 लाखांचा विषय परत पाठविला

By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:17+5:302014-12-20T22:27:17+5:30

सोलापूर : भगवाननगर येथील घरकूल बांधण्यासाठी ठेकेदाराने माळशिरस, सांगोला येथून वाळू आणली म्हणून त्याला 14 लाख 43 हजार रुपये दरवाढ द्यावी असा प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव स्थायी समितीने आज परत पाठविला.

Sandal Reconnaissance Committee for Gharikulas: The topic of 14 lakhs has been sent back | घरकूलसाठी माळशिरसवरून आणली वाळू स्थायी सभा : 14 लाखांचा विषय परत पाठविला

घरकूलसाठी माळशिरसवरून आणली वाळू स्थायी सभा : 14 लाखांचा विषय परत पाठविला

Next
लापूर : भगवाननगर येथील घरकूल बांधण्यासाठी ठेकेदाराने माळशिरस, सांगोला येथून वाळू आणली म्हणून त्याला 14 लाख 43 हजार रुपये दरवाढ द्यावी असा प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव स्थायी समितीने आज परत पाठविला.
स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी सभा झाली. या सभेत पहिल्याच विषयावर वादळी चर्चा झाली. आय. एच. एस. डी. पी. योजनेंतर्गत भगवाननगर येथे घरकूल बांधण्यात आले आहे. या बांधकामाचा ठेका एस. बी. खाकाळ यांना देण्यात आला आहे. काम करताना ठेकेदाराने माळशिरस येथून 135 मीटर अंतर कापून 880 घनमीटर व 86 किलोमीटर अंतर कापून सांगोला येथून 958 घनमीटर इतकी वाळू आणली. यासाठी ठेकेदाराने 32 लाख 59 हजार इतका दर वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे. नगर अभियंता कार्यालयाने पाहणी करून 14 लाख 43 हजार देण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रस्तावासोबत ठेकेदाराने सादर केलेल्या वाळूच्या पावत्या कोठे आहेत असा सवाल नागेश ताकमोगे यांनी उपस्थित केला. इतक्या लांबून वाळू का व केव्हा आणली याबाबत सविस्तर अहवाल द्यावा असे सूचित करून सभापती मिस्त्री यांनी प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविला.
मुदगल उद्यानात विविध सुधारण्याचा मक्ता, जुने शौचालय पाडून बांधणे व बगिचा दुरुस्तीचा ठेका हे विषय फेरसादर करण्यात आले. ए.जी. पाटील कॉलेज ते लोकूतांडा, पारशी विहीर ते नई जिंदगी चौक, भारती विद्यापीठ ते चैतन्यनगर, ओमनम:शिवायनगर, भारतमातानगर येथे पाईपलाईन टाकणे, अग्निशमन कर्मचार्‍यांना गणवेश खरेदी, 70 एचपी पंप दुरुस्ती, राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यालयासाठी कोटणीस शॉपिंग सेंटरमधील बंद खोली,नाहिदा तब्बस्सुम संस्थेला क्लास घेण्यासाठी साखरपेठ दवाखान्यामागील बंद अभ्यासिका भाड्याने देण्याचे प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले.
इन्फो..
बडतर्फीची कारवाई मागे घ्या..
विविध कारणांचा ठपका ठेवून महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बडतर्फ केलेले उद्यान विभागातील मजूर सिद्धेश्वर हजारे व अग्निशामक दलातील सेवानिवृत्त लिपिक ताटीपामूल यांच्यावरील कारवाई मागे घेण्यासाठी आलेले अपील एकमताने मंजूर करण्यात आले.

Web Title: Sandal Reconnaissance Committee for Gharikulas: The topic of 14 lakhs has been sent back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.