पायी चालण्याच्या शर्यतीत संदीपने मोडला राष्ट्रीय विक्रम
By admin | Published: February 18, 2017 09:51 PM2017-02-18T21:51:34+5:302017-02-18T21:51:34+5:30
हरियाणाच्या संदीप कुमार याने शनिवारी ५०० किमी पायी चालण्याचा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि सुवर्ण जिंकले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - हरियाणाच्या संदीप कुमार याने शनिवारी ५०० किमी पायी चालण्याचा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि सुवर्ण जिंकले. त्याच्यासह दोन अन्य खेळाडूंना पुढील महिन्यात होणाºया लंडन विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. संदीपने ३ तास ५५ मिनिटे ५९.०५ सेकंद वेळेची नोंद केली. याआधी त्याचा राष्ट्रीय विक्रम ३ तास ५६ मिनिटे २२ सेकंदांचा होता. मे २०१४ मध्ये चीनच्या तायकांग येथे विश्व रेस वॉकिंग कपमध्ये त्याने ही वेळ नोंदविली होती. सेनादलाचा जितेंद्रसिंग याने ४ तास २ मिनिटे ११ सेकंदांसह दुसरे आणि चंदनसिंग याने ४ तास ४ मिनिटे १८.४१ सेकंदांसह तिसरे स्थान घेतले. जितेंदर आणि चंद हे देखील चार २ ते १३ आॅगस्ट या कालावधीत होणाºया विश्व चॅम्पिनशिपमध्ये सहभागी होणार आहेत. विश्व चॅम्पियनशिपमध्ये पुरुष ५० किमीपायी चालण्याची पात्रता वेळ चार तास सहा मिनिटे ठेवण्यात आली आहे. २०१४ च्या आशियाडमध्ये संदीप चौथ्या स्थानावर होता. पुरुषांच्या २० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमवीर
सेनादलाचा केटी इरफान याने बाजी मारली. त्याने १ तास २२ मिनिटे ४३.४८ सेकंद वेळ नोंदविली तर महिला गटात अव्वल आलेली ओएनजीसीची प्रियंका हिने १ तास ३७ मिनिटे ५८.३२ सेकंद वेळेची नोंद केली. शांतीकुमारीला रौप्य आणि राणी यादवला कांस्य मिळाले. या दोघीही रेल्वेच्या खेळाडू आहेत. महिला गटात कुणीही खेळाडू विश्व चॅम्पियनशिपची पात्रता गाठू शकल्या नाहीत.
‘‘आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडल्याचा आनंद आहे. लंडन विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरल्याने माझा आत्मविश्वास वाढेल. भविष्यात सुधारणा करीत आणखी चांगल्या वेळेची नोंद करण्याचा माझा प्रयत्न असेल.’’- संदीप कुमार.
(वृत्तसंस्था)