संदीप इन्स्टट्यिूटच्या विद्यार्थ्यांची राज्य स्पर्धेत भरारी
By admin | Published: September 19, 2016 11:58 PM2016-09-19T23:58:16+5:302016-09-20T00:17:48+5:30
नाशिक : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक प्रवरानगर, लोणी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १७) राज्यस्तरीय टेक्निकल क्वीझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा देशातील मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन व इलेक्ट्रिकल डिप्लोमा, इंजिनिअरिंग पदविकेच्या विद्यार्थ्यांसाठी खुली होती. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हे देण्यात आली.

सदर राज्यस्तरीय टेक्निकल क्वीझ स्पर्धेत कॉम्प्युटर विभागातील उत्कर्ष राय, नितेश पाल व श्रीकांत आव्हाड यांना द्वितीय क्रमांकाने (रोख दोन हजार रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह) गौरविण्यात आले. तसेच टेक्निकल क्वीझ स्पर्धेत मेकॅनिकल विभागातील सिद्धांत नगरकर, जय कोठावदे व सागर आहिरे यांना तृतीय क्रमांकाने (रोख दीड हजार रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह) गौरवण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर विभागातील प्रा. भूषण ठाकरे व मेकॅनिकल विभागातील प्रा. ऋषिकेश सोनार, संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा, महाव्यवस्थापक मोहिनी पाटील, पी. आय. पाटील, संदीप इन्स्टट्यिूट ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य संदीप पवार, कॉम्प्युटर शाखेचे विभागप्रमुख प्रा. विशाल ओहोळ, मेकॅनिकल शाखेचे विभागप्रमुख प्रा. एस. एस. राऊत आदिंचे मार्गदर्शन मिळाले. (वाणिज्य प्रतिनिधी)