संदीप नाईक यांनी केली मान्सूनपूर्व कामांची पाहणी
By admin | Published: May 6, 2015 11:43 PM2015-05-06T23:43:25+5:302015-05-06T23:43:25+5:30
नवी मंुबई : ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी आज शहराचा दौरा करून महापालिकेमार्फत सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांची पाहणी केली. विशेषत: नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत ही कामे मुदतीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.
Next
न ी मंुबई : ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी आज शहराचा दौरा करून महापालिकेमार्फत सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांची पाहणी केली. विशेषत: नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत ही कामे मुदतीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले. दिघा येथील विष्णुनगर-सुभाषनगर येथून या दौर्याची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ऐरोली सेक्टर-३ येथील मोठ्या नाल्यांची पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा पाढा आमदार नाईक यांच्यासमोर वाचला. सेक्टर-१५ येथील जॉगिंग ट्रॅकची पाहणी करताना त्यांनी तेथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. घणसोली परिसरातील घरोंदा-सिम्प्लेक्स वसाहतीला जोडणार्या मुख्य नाल्याची पाहणी करताना एमआयडीसीच्या दूषित पाण्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याची बाब रहिवाशांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन नाईक यांनी रहिवाशांना दिले. कोपरखैरणे सेक्टर-२९ येथील मुख्य नाल्यातील गाळ उपसण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनातील संबंधित अधिकार्यांना केल्या. या पाहणी दौर्यात महापालिकेचे वॉर्ड अधिकारी, स्वच्छता अधिकारी, पक्षाचे आजी-माजी नगरसेवक व रहिवाशी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)................फोटो: 0६ संदीप नाईक