दहशतवादी संदीपचा भाऊ म्हणतो "त्याला गोळ्या घाला"

By admin | Published: July 11, 2017 11:34 AM2017-07-11T11:34:27+5:302017-07-11T11:34:27+5:30

"जर माझ्या भावाचा दहशतवादाशी काही संबंध असेल तर सरकार त्याला गोळ्या घालूदेत, किंवा त्याला फाशी देऊ दे"

Sandeep's brother says "put him on fire" | दहशतवादी संदीपचा भाऊ म्हणतो "त्याला गोळ्या घाला"

दहशतवादी संदीपचा भाऊ म्हणतो "त्याला गोळ्या घाला"

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 11 - जम्मू काश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या मॉड्यूलचा भांडाफोड करत खो-यातून दहशतवाद्यासोबत दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये राहणारा संदीप शर्मा उर्फ आदिल याचा समावेश आहे. संदीपचा भाऊ प्रवीण हरिद्वारमध्ये टॅक्सी चालवतो. "जर माझ्या भावाचा दहशतवादाशी काही संबंध असेल तर सरकार त्याला गोळ्या घालूदेत, किंवा त्याला फाशी देऊ दे, आमचा काहीच विरोध नाही", असं प्रवीण बोलला आहे. 

आणखी वाचा
सहा पोलिसांची हत्या करणा-या दहशतवादी बशीर लष्करीचा खात्मा
उत्तर प्रदेशातून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक
 
संदिपचं कुटुंब मुझफ्फरनगरमधील नई मंडी कोतवाली क्षेत्रात राहतं. पोलीस सध्या त्याच्या वहिनीची चौकशी करत आहे.  जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले की, 1 जुलै रोजी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लष्करीचा खात्मा करण्यात आला. संदीप शर्मादेखील त्याच घरात होता, जेथे बशीर लष्करी लपून राहिला होता. पोलिसांची निर्घूणपणे हत्या करणे, तसंच बँक लूटण्याच्या घटनांमध्ये संदिप सहभागी होता. संदीपनं स्वतःचे नाव बदलून आदिले असे ठेवले होते, अशीही माहिती समोर आली आहे.  
 
संदीप शर्मा शोपूरमधील शकूर नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून तो लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात होता.  संदीप 2012 रोजी काश्मीर खो-यात आला होता. त्यानंतर 2017 मध्ये तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला. संदीपवर शस्त्रास्त्र लुटणं, दहशतवादी हल्ले घडवणे यांसारखे आरोप आहेत, अशी माहितीदेखील खान यांनी दिली. संदिपच्या अटकेमुळे दहशतवाद्यांच्या नवा ट्रेंडचा खुलासा झाला आहे. "माझ्या माहितीप्रमाणे हे पिहलं प्रकरण आहे. संदीप एटीएमची लूट करण्यात हुशार होता. लष्कर त्याचा वापर करत होतं. संदिप काश्मीरचा स्थानिक नसल्याचा पुर्ण फायदा ते उचलत होते", असं मुनीर खान यांनी सांगितलं आहे.
 
दरम्यान, काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा दलानं 1 जुलै रोजी झालेल्या चकमकीत लष्कर -ए- तोयबाच्या कमांडर बशीर लष्करीसहीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गेल्या महिन्यात अचबल येथे पोलीस दलावर झालेल्या हल्ल्यात बशीरचा सहभाग होता. या हल्ल्यात पोलीस स्टेशनचे प्रभारी फिरोज अहमद डार यांच्यासहीत 6 पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. यावेळी दहशतवाद्यांनी शहिदांच्या मृतदेहाची विटंबनाही केली होती.  
 
यानंतर 1 जुलै रोजी लष्कर कमांडर बशीर लष्करीचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळालं आहे. बशीर लष्करीसोबत अन्य दहशतवादी आजाद मलिकलाही ठार करण्यात आले.  जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.  

Web Title: Sandeep's brother says "put him on fire"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.