Sandhya Devanathan: संध्या देवनाथन मेटा इंडियाच्या नवीन प्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 07:06 AM2022-11-18T07:06:52+5:302022-11-18T07:07:14+5:30
Meta India: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने भारतातील मेटा प्रमुख म्हणून Sandhya Devanathan यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. अजित मोहन यांच्या राजीनाम्यानंतर संध्या देवनाथन यांची मेटा इंडियाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : फेसबुकची मूळ कंपनी मेटाने भारतातील मेटा प्रमुख म्हणून संध्या देवनाथन यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. अजित मोहन यांच्या राजीनाम्यानंतर संध्या देवनाथन यांची मेटा इंडियाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला भारतातील मेटा प्रमुख अजित मोहन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता ही महत्त्वाची जबाबदारी देवनाथन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आता संध्या देवनाथन भारतात परततील आणि कंपनीच्या संघटनेचे व धोरणाचे नेतृत्व करतील.
२२ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या व बँकिंग, पेमेंट्स, तंत्रज्ञानातील आंतरराष्ट्रीय कारकीर्द असलेल्या जागतिक बिजनेस लीडर आहेत.
२०२३ संध्या १ जानेवारी २०२३ रोजी पदभार स्वीकारतील. त्या मेटा इंडियाच्या प्रमुख म्हणून महत्त्वाचे ब्रँड, निर्माते, जाहिरातदार, भागीदार यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि कंपनीचा व्यवसाय वाढवण्यासाठी काम करतील. कंपनीच्या महसूल वाढीला गती देण्यावर त्यांचे लक्ष असेल.