संघाची विचारसरणी देशाच्या हिताची नाही

By admin | Published: April 19, 2016 03:24 AM2016-04-19T03:24:30+5:302016-04-19T03:24:30+5:30

देशात सहिष्णुता असणे आवश्यक असून, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दोघे मिळून असहिष्णुतेचे वातारण निर्माण करीत आहेत, त्यातून देशातील शांतता आणि सद्भाव यांना धक्का पोहोचला आहे

The Sangh's ideology is not for the welfare of the country | संघाची विचारसरणी देशाच्या हिताची नाही

संघाची विचारसरणी देशाच्या हिताची नाही

Next

पाटणा : देशात सहिष्णुता असणे आवश्यक असून, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दोघे मिळून असहिष्णुतेचे वातारण निर्माण करीत आहेत, त्यातून देशातील शांतता आणि सद्भाव यांना धक्का पोहोचला आहे. एकूणच संघ आणि भाजप यांची विचारसरणी देशाच्या हिताची नाही, असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी केले.
दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजपने जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यात त्या पक्षाला अपयश आले आहे. त्यामुळे त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी शांतता आणि सद्भाव यांनाच धक्का देत समाजामध्ये असहिष्णुता निर्माण केली जात आहे, असे सांगून ते म्हणाले की काळा पैसा परत आणण्याची भाषा करणारा हा पक्ष आता गोमांस, जिहाद यासारखे मुद्दे उकरून काढत आहे. आम्ही काही काळ भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी होतो, हे खरे आहे. पण त्यामुळे आम्ही आमच्या विचारसरणीशी कधी समझोता केला नाही, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: The Sangh's ideology is not for the welfare of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.