सांगली ३३ जनावरे आगीत होरपळली
By admin | Published: April 4, 2015 01:54 AM2015-04-04T01:54:06+5:302015-04-04T01:54:06+5:30
- संसारोपयोगी साहित्य जळाले
Next
- ंसारोपयोगी साहित्य जळालेगोटखिंडी (जि. सांगली) : बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील गावठाण हद्दीतील दळवी मळा परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत जनावरांचे १७ गोठे जळून खाक झाले. यात ३३ जनावरे दगावली असून, संसारोपयोगी साहित्यही भस्मसात झाले.बहाद्दूरवाडी गावाच्या उत्तरेला गावठाण जागा आहे. या ठिकाणी राजारामबापू साखर कारखाना व वारणा साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांसह स्थानिक व बाहेरून आलेली रोजंदारी करणारी कुटुंबे छप्परवजा शेड घालून वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सर्वजण शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. आष्टा, इस्लामपूर नगरपालिका व राजारामबापू साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. पण तोपर्यंत रौद्र रूप धारण केलेल्या आगीत १५ म्हशी, ११ रेड्या, ४ गायी, ३ शेळ्या, कोकरे, कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. याबरोबरच मजुरांचे संसारोपयोगी साहित्य, भांडी, धान्यही जळून खाक झाले.