लखनौच्या महाविद्यालयात ‘सॅनिटरी नॅपकीन मशीन’
By admin | Published: August 14, 2015 12:53 AM2015-08-14T00:53:42+5:302015-08-14T09:06:04+5:30
तारुण्याच्या उंबरठ्यावर होणाऱ्या शारीरिक बदलांतून उद्भवणारे ‘ऋतुचक्र’ हे मुलींच्या शाळा सोडण्यामागचे मुख्य कारण आहे, असे मानणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारची चिंता
लखनौ : तारुण्याच्या उंबरठ्यावर होणाऱ्या शारीरिक बदलांतून उद्भवणारे ‘ऋतुचक्र’ हे मुलींच्या शाळा सोडण्यामागचे मुख्य कारण आहे, असे मानणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारची चिंता दूर करण्याचे प्रयत्न राजधानी लखनौच्या एका महाविद्यालयाने केले आहे. शहरातील अवध गर्ल्स डिग्री कॉलेजने आपल्या येथे मुलींसाठी पहिली ‘सॅनिटरी नॅपकीन’ अर्थात ‘सॅनिटरी वेंडिंग’ मशीन लावली आहे.
महाविद्यालयांतील विद्यार्थिनींकडूनही यास अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक पॅडसाठी मुलींकडून १० रुपये घेतले जातात. विशेष म्हणजे वापरानंतर या पॅडची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने आणखी एक मशीन लावण्याचेही महाविद्यालयाच्या विचाराधीन आहे. लखनौ विद्यापीठाचा इंग्रजी विभाग आणि मुलींसाठी असलेल्या ‘कॉमन रूम’मध्येही सॅनिटरी मशीन लावण्याची योजना आहे. (वृत्तसंस्था)