गुजरातमध्ये मिऴणार सॅनिटरी नॅपकिनचे पॅकेट फक्त १ रुपयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 07:29 PM2016-04-28T19:29:57+5:302016-04-28T20:04:15+5:30
जरात सरकारने गुरवारी 'तरुणी सुवीधा प्रोग्रॉम' मार्फत राज्यातील वय वर्ष १० ते १९ वयाच्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन्सचे पॅकेट १ रुपयात देण्याची योजना आखली आहे
Next
>ऑनलआन लोकमत
गांधीनगर, दि. २८ - गुजरात सरकारने 'तरुणी सुविधा प्रोग्रॉम' च्या माध्यमातून राज्यातील १० ते १९ वर्षीय मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे पॅकेट फक्त १ रुपयात देण्याची योजना आखली आहे.
सॅनिटरी नॅपकिन्सच्या एका पॅकेटमध्ये ६ प्रत असतील असे सांगण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत गुजरात राज्यातील जवळपास ४० लाख मुलींना याचा लाभ घेता येईल. मासिक पाळीच्यावेळी किशोरवयीन मुलींचे आरोग्य संतुलीत राखण्यासाठी यावर्षीपासून टप्प्याटप्याने राज्यात ही योजने अमंलबजावणी केली जाणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री नितीन पटेल यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
ही योजना अतिशय चांगली आहे. त्यामुळे शाळकरी मुलींमध्ये मासिक पाळीबद्दलही जागरूकता येऊ शकेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर ही नॅपकिन्स वाटप करताना ती निर्जंतुक आहेत का व ती चांगल्या दर्जाची आहेत का हे पाहणे फार महत्त्वाचे आहे; अन्यथा पोषण आहारासारख्या तक्रारी झाल्यास त्याचा हेतू साध्य होणार नाही याकडे ही लक्ष असेल असे, नितीन पटेल म्हणाले.
मध्यम वर्गातील आणि गरीब कुटंबातील मुली आर्थिक अडचणीमुळे मासिकपाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करत नाहीत. त्यामुळे त्यांना शारिरिक त्रास जाणवतो यामुळे आम्ही ही योजना राबवत असल्याचे गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी सांगितले.