संजय दत्त होऊ शकतो स्वच्छ भारत मिशन आणि स्मार्ट सिटीचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर

By admin | Published: March 2, 2016 06:15 PM2016-03-02T18:15:56+5:302016-03-02T18:15:56+5:30

अभिनेता संजय दत्त दिल्ली महापालिकेच्या स्वच्छ भारत मिशन आणि स्मार्ट सिटी कार्यक्रमाचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर होण्याची शक्यता आहे

Sanjay Dutt can be a clean Bharat Mission and Smart City brand ambassador | संजय दत्त होऊ शकतो स्वच्छ भारत मिशन आणि स्मार्ट सिटीचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर

संजय दत्त होऊ शकतो स्वच्छ भारत मिशन आणि स्मार्ट सिटीचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २ - अभिनेता संजय दत्त दिल्ली महापालिकेच्या स्वच्छ भारत मिशन आणि स्मार्ट सिटी कार्यक्रमाचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर होण्याची शक्यता आहे. दिल्ली महापालिकेने संजय दत्तशी याबाबत चर्चा केल्याचीदेखील माहिती मिळत आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात झालेली पाच वर्षांची शिक्षा भोगून अभिनेता संजय दत्तची नुककती तुरुंगातून सुटका झाली आहे.
 
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली महापालिकेचे चेअरमन नरेश कुमार यांनी स्वच्छ भारत मिशन आणि स्मार्ट सिटी कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रिटीजशी संपर्क साधल्याची माहिती दिली आहे. आम्ही यासाठी चित्रपट आणि स्पोर्ट्समधील अनेक सेलिब्रिटीजशी चर्चा केली आहे. यासाठी अनेकांची नाव चर्चेत असल्याची माहिती नरेश कुमार यांनी दिली आहे. मात्र संजय दत्तसंबंधी बोलण्यास नरेश कुमार यांनी नकार दिला आहे.
 

Web Title: Sanjay Dutt can be a clean Bharat Mission and Smart City brand ambassador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.