'माझ्या समोर मुलाला गोळी मारली, मलाही मारतील', IAS अधिकाऱ्याचा व्हिजिलन्सवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 02:59 PM2022-06-26T14:59:20+5:302022-06-26T15:00:42+5:30
भ्रष्टाचाराच्या आरोपात ताब्यात असलेले पंजाबचे वरिष्ठ IAS अधिकारी संजय पोपली यांनी त्यांच्या मुलाचा खून झाल्याचा आरोप केला आहे. व्हिजिलन्सने पोपली यांच्या घरातून 9 सोन्याच्या विटा, 49 बिस्किटे आणि मोठी रोकड जप्त केली.
मोहाली: भ्रष्टाचाराच्या आरोपात ताब्यात असलेले पंजाबचे वरिष्ठ IAS अधिकारी संजय पोपली यांनी त्यांच्या मुलाचा खून झाल्याचा आरोप केला आहे. कार्तिक पोपलीवर व्हिजिलन्स(दक्षता) विभागाने गोळी झाडल्याचा आरोप संजय पोपली यांनी केला आहे. तसेच, आता विजीलंसवाले माझाही खून करतील, असा दावाही त्यांनी केला आहे. पोपलीने मुलाच्या मृत्यूसाठी दक्षता विभागाचे डीएसपी अजय कुमार यांना जबाबदार धरले आहे.
#WATCH | I am an eye-witness, they (police officials) are taking me....my son was shot by them...: IAS officer Sanjay Popli https://t.co/5GgDWrlxEDpic.twitter.com/SsIj4ov9q4
— ANI (@ANI) June 25, 2022
आईनेही दक्षताला जबाबदार धरले
संजय पोपलीच्या पत्नी आणि कार्तिकची आई श्री पोपली यांनीही शनिवारी मुलाच्या मृत्यूसाठी दक्षता जबाबदार धरले. त्यांनी आरोप केला की, दक्षता विभागाने त्यांच्या मुलाला घराच्या वरच्या मजल्यावर नेले, तिथे गोळ्या घालून खून केला. मात्र, व्हिजिलन्सने हे आरोप फेटाळून लावले आहेत. डीएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या पथकाने छापा टाकला, परंतु कार्तिक पोपलीच्या मृत्यूशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांची टीम परत आल्यानंतर हा प्रकार कळला. ते घराच्या आतही गेले नाहीत.
Chandigarh | Son of Punjab IAS officer allegedly shoots self
Vigilance team reached here (IAS Sanjay Popli's house) for enquiry&heard a gunshot. After verification, they realized his son has shot himself with his licensed gun. He was shifted to hospital: UT SSP Kuldeep Chahal pic.twitter.com/rh8Z81R7Zx— ANI (@ANI) June 25, 2022
9 सोन्याच्या विटा, 49 बिस्किटे, रोकड अन्...
संजय पोपली यांच्या घरातून व्हिजिलन्स विभागाने 12 किलो सोने जप्त केले आहे. यात एक किलो सोन्याच्या 9 विटा, 49 सोन्याची बिस्किटे, 12 सोन्याची नाणी, तीन किलो चांदीच्या विटांचा समावेश आहे. याशिवाय, चार आयफोन, सॅमसंग फोल्डर फोन, स्मार्ट घड्याळे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईदरम्यान कार्तिकने स्वत:वर गोळी झाडली, असे पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.