संजय राऊतांवर शिवसैनिकानंच फेकली शाई

By admin | Published: October 4, 2016 04:19 PM2016-10-04T16:19:06+5:302016-10-04T16:49:29+5:30

लखनऊमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Sanjay Raut gets Shivsainikancham thrown in | संजय राऊतांवर शिवसैनिकानंच फेकली शाई

संजय राऊतांवर शिवसैनिकानंच फेकली शाई

Next

ऑनलाइन लोकमत

उत्तर प्रदेश, दि. 4 - लखनऊमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेनेनं लखनऊमध्ये आयोजित केलेल्या रॅलीत हा प्रकार घडला आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेच्याच कार्यकर्त्यानं संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र संजय राऊत यांच्या सतर्कतेमुळे शाई अंगावर न पडता रस्त्यावर पडली आहे. संजय राऊत यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यानं शाई फेकल्यानं राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. मात्र शिवसैनिकानंच संजय राऊत यांच्यावर शाई का फेकली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

 

संजय राऊत म्हणाले, माझ्यावर शिवसैनिकानंच साई का फेकली याचा मी शोध घेतोय, या प्रकरणात स्वतः लक्ष घालत आहे.

Web Title: Sanjay Raut gets Shivsainikancham thrown in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.