Sanjay Raut: दिल्लीत भेटीगाठींचं सत्र! आता संजय राऊत शरद पवारांच्या घरी, भेटीनंतर दोघंही उपराष्ट्रपतींकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 06:07 PM2021-07-17T18:07:55+5:302021-07-17T18:10:52+5:30
Sanjay Raut Meets Sharad Pawar: शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यानंतर दोघंही उपराष्ट्रपतींकडे रवाना
Sanjay Raut Meets Sharad Pawar: देशाच्या राजधानीत सध्या भेटीगाठींचं सत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं. पण ही भेट सहकार कायद्यातील सुधारणांबाबत चर्चा करण्यासाठी झाल्याचं पवारांनी मोदींनी लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट झालं. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर दोघंही उपराष्ट्रपतींच्या बैठकीसाठी एकाच गाडीतून रवाना झाले आहेत.
अतिउत्साहात तत्वांचा बळी नको!; सहकार कायद्यातील विसंगतीवरुन पवारांचं मोदींना सविस्तर पत्र
संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत उपराष्ट्रपतींनी बैठक आयोजित केल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी पवार आणि राऊत रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान मोदी-शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली?; राष्ट्रवादीनं दिली महत्त्वाची माहिती
दरम्यान, शरद पवार यांनी आज पंतप्रधानांची भेट घेऊन सहकार कायद्यातील सुधारणांसंबंधी एक सविस्तर पत्र मोदींना दिलं. यात नव्या कायद्यातील आक्षेपांसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून सहकार क्षेत्राशी निगडीत काही मुद्यांवर पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोदी सरकारनं सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. या मंत्रालयाची सुत्रं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहेत.
पवारांना भेटण्याआधी मोदी कोणाला भेटले? खास भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा; समीकरणं बदलणार?
सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील कायद्यांमधील सुधारणांचं स्वागत आहे. पण सहकार क्षेत्रातील बदलांमुळे सहकाराच्या मूळ तत्वांचा बळी जाणार नाही ना याची काळजी घेण्याची गरज असल्याचं पवारांनी पत्रात म्हटलं आहे. कायद्यात काही विसंगती असल्याचं पवारांनी मोदींच्या निदर्शनास आणून दिलं आहे.