संविधानिक दर्जा बदलला तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवायला कुणी नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 11:14 AM2017-07-29T11:14:36+5:302017-07-29T11:16:18+5:30

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये बदल करून जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेष अधिकारावर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.

sanvaidhaanaika-darajaa-badalalaa-tara-kaasamairamadhayae-tairangaa-phadakavaayalaa-kaunai-nasaela | संविधानिक दर्जा बदलला तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवायला कुणी नसेल

संविधानिक दर्जा बदलला तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवायला कुणी नसेल

Next
ठळक मुद्देभारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये बदल करून जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेष अधिकारावर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.थोडी जरी ढवळाढवळ केली तर जम्मू-काश्मीरमध्ये तिरंग्याचं संरक्षण करणारा आणि तिरंगा फडकवणारा कोणीच उरणार नाही, असा थेट इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला आहे.शुक्रवारी काश्मीरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला.

श्रीनगर, दि. 29- भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये बदल करून जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेष अधिकारावर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यात थोडी जरी ढवळाढवळ केली तर जम्मू-काश्मीरमध्ये तिरंग्याचं संरक्षण करणारा आणि तिरंगा फडकवणारा कोणीच उरणार नाही, असा थेट इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला आहे. शुक्रवारी काश्मीरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला. जर घटनेच्या अनुच्छेद ३५(अ) मध्ये काही बदल केला किंवा त्याच्याशी छेडछाड केली तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या नॅशनल कॉन्फ्रन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीसारख्या मुख्य प्रवाहातील पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आयुष्य धोक्यात येईल, असा थेट इशारा मूफ्ती यांनी दिला आहे. काश्मिरी जनतेच्या विशेष अधिकारात कोणतीही ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नसून त्याबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचंही मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.  
संविधानातील अनुच्छेद ३५ (अ) रद्द करण्यासंबंधी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ३५ अ नुसार जम्मू-काश्मीरमधील आमदार आणि खासदारांना विशेष सवलती देण्यात येतात. घटनेमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. काश्मीरप्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. विशेषाधिकारांवर हल्ले करून हा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा करायचा नाही, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.
या कार्यक्रमात बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलं. तसंच माझ्यासाठी भारत म्हणजेच इंदिरा गांधी आहेत, असं सांगितलं. काही वृत्तवाहिन्यांवरील प्राइमटाइम शोमध्ये ज्या पद्धतीनं भारताबाबत सांगितलं जातं त्यामुळे मी नाराज असल्याचंही मुफ्ती म्हणाल्या आहेत. यामुळे भारत आणि काश्मीरमधील दरी आणखी वाढण्यास मदत होते आहे, असं मत त्यांनी मांडलं आहे. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान ज्या भारताबद्दल बोललं जातं तो भारत देश मला माहिती नाही, असंही मुफ्ती म्हणाल्या आहेत. 
टेरर फंडिंगच्या आरोपाखाली एनआयएने फुटीरतावादी नेत्यांची धरपकड केली आहे. पण अशी धरपकड करून मुख्य समस्या सुटणार नाही, असं सांगतानाच पीडीपी आणि भाजप आघाडी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील परिस्थिती काश्मीरमध्ये पुन्हा निर्माण करण्यात यशस्वी होईल, अशी आशाही मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली आहे. 
 

Web Title: sanvaidhaanaika-darajaa-badalalaa-tara-kaasamairamadhayae-tairangaa-phadakavaayalaa-kaunai-nasaela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.