ही आहे भारतातील सर्वात महाग भाजी, एका किलोसाठी मोजावे लागतात तब्बल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 04:31 PM2021-07-11T16:31:19+5:302021-07-11T16:31:19+5:30

Most expensive vegetable in India: सरई बोडा असे या भाजीचे नाव आहे. वर्षभरामध्ये केवळ दीड महिन्याच्या काळातच ही भाजी उपलब्ध होते.

Sarai boda mushroom is the most expensive vegetable in India, you have to pay 2000 for per kilo | ही आहे भारतातील सर्वात महाग भाजी, एका किलोसाठी मोजावे लागतात तब्बल...

ही आहे भारतातील सर्वात महाग भाजी, एका किलोसाठी मोजावे लागतात तब्बल...

googlenewsNext
ठळक मुद्देछत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील साल वृक्षांच्या जंगलांमध्ये सरई बोडा भाजी आढळून येते

रायपूर - आपल्या देशात संस्कृती, खानपान, राहणीमान यामध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागातील लोकांच्या आहारात वेगवेगळे पदार्थ असतात. अनेक ठिकाणी स्थानिक उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश असतो. (most expensive vegetable in India) आज आम्ही अशाच एका भाजीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ही भाजी भारतातील सर्वात महागडी भाजी असल्याचा दावा करण्यात येत आहे. या भाजीचं नाव आहे. सरई बोडा असे या भाजीचे नाव आहे. वर्षभरामध्ये केवळ दीड महिन्याच्या काळातच ही भाजी उपलब्ध होते. गावांमध्ये ही भाजी ३०० रुपये किलो आणि शहरी भागात ६०० रुपये प्रति किलो दराने मिळते. तर मोठ्या महानगरांमध्ये या भाजीला तब्बल २००० रुपये प्रतिकिलो एवढा दर मिळतो. (Sarai boda mushroom is the most expensive vegetable in India, you have to pay 2000 for per kilo)

छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील साल वृक्षांच्या जंगलांमध्ये सरई बोडा भाजी आढळून येते. साल वृक्षाला छत्तीसगडमध्ये सरई म्हणतात. तर बोडा हा स्थानिक आदिवासींनी दिलेला शब्द आहे. ही भाजी आदिवासींनीच शोधून काढली आहे. वनसंपत्तीवर अवलंबून असलेले आदिवासी येथे तयार होणाऱ्या प्रत्येक पदार्थाबाबत जाणतात. बोडा त्यापैकीच एक आहे. बोडा ही एकप्रकारची फंगस आहे. तज्ज्ञांनी याचे शास्त्रीय नाव शोरिया रोबुस्टा असे ठेवले आहे. या भाजीला छत्तीसगडमधील काळे सोने असेही म्हटले जाते.

सालच्या जंगलांमध्ये जेव्हा पहिल्या पावसात माती ओली होते आणि त्यानंतर पहिल्यांदा जी आर्द्रता निर्माण होते. त्यावेळी साल वृक्षाच्या मुळांमधून एक विशिष्ट्य प्रकारचा द्रव बाहेर पडतो.त्यानंतर जमिनीवर पडणाऱ्या साल वृक्षाच्या वाळलेल्या पानांखाली ही फंगस तयार होते. तिला बोडा असे म्हणतात. आदिवासी लोक कुठल्याही लाकडाने तिला जमिनीबाहेर सुरक्षितपणे काढतात.

ही भाजी एक प्रकारची फंगस असूनही एवढी महाग का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर असं आहे. बोडा ही पूर्णपणे नैसर्गिक उत्पादित होणारी भाजी आहे. त्याची शेती करता येऊ शकत नाही. ती विशेष प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपोआप तयार होते. मात्र ती आदिवासींना जंगलात अगदी मोफत मिळते. तुम्ही जंगलात गेलात तर तुम्हालाही ती मिळू शकते. मात्र तिचा शोध घेणे आणि ती एकत्र करणे ही बाब खूप वेळखाऊ आहे. या भाजीची असलेली विशिष्ट्य चव आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने ही भाजी खूप महाग आहे. त्यामुळेच तिचा भाव दोन हजार रुपये किलोपर्यंत जातो.

बोडा भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन, कार्बोहायड्रेट आणि खनिजे सापडतात. त्यामुळे ही भाजी पौष्टिक आहे. तसेच ही भाजी कुपोषण, हृदय आणि पोटाच्या आजारांवर उपयुक्त मानली जाते. जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या भोजनात या भाजीचा अनेक शतकांपासून समावेश आहे. मात्र आता ही भाजी शहरांमध्येही विकली जाऊ लागली आहे. 
 

Web Title: Sarai boda mushroom is the most expensive vegetable in India, you have to pay 2000 for per kilo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.