सैराट ! मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 01:12 PM2017-09-09T13:12:14+5:302017-09-09T13:34:54+5:30

मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. कैमूर जिल्ह्यातील मुबारकपूर गावात हे ऑनर किलिंग झालं आहे.

Sarat! The girl got married to a lower cast member and killed her parents and shot her to death | सैराट ! मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या

सैराट ! मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देमुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्याहल्ल्यात दांपत्याच्या दोन मुलीही जखमी झाल्या आहेतपोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तिघांची नावे असून, चौघे अज्ञात सामील आहेत

पाटणा, दि. 9 - मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणाच्या आई-वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. कैमूर जिल्ह्यातील मुबारकपूर गावात हे ऑनर किलिंग झालं आहे.  मुलीने खालच्या जातीतील मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यात दांपत्याच्या दोन मुलीही जखमी झाल्या आहेत. पाटणापासून 216 किमी अंतरावर असणा-या मुबारकपूर गावात मन हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल चौधरी (50) आपली पत्नी शांती देवी (45) आणि मुलींसोबत गच्चीवर झोपले होते. हल्लेखोरांनी ही संधी साधत हल्ला केला आणि कमल चौधरी आणि शांती देवी यांची गोळ्या घालून हत्या केली. हल्यात कमल चौधरी यांच्या दोन्ही मुली किरण देवी (20) आणि सुश्मिता कुमारी (15 ) गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाराणसीमधील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस-बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना भरती करण्यात आलं आहे. 

हे ऑनर किलिंग प्रकरण असल्याचं स्पष्ट होत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी झालेल्या किरण देवीने पोलिसांना  दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ धर्मेंद्र चौधरी याचे तीन महिन्यापुर्वी दुस-या जातीतील मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्या दोघांनी लग्न केलं होतं. त्यानंतर ते दिल्लीला जाऊन राहत होते. 

पोलिसांनी गावक-यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, 'मुलगी राजपूर घराण्यातील आहे. धर्मेंद्र खालच्या जातीतला असल्याने त्यांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं. मुलीचे नातेवाईक आपण याचा बदला घेऊ अशी धमकीही नेहमी देत असत'. मुलीच्या भावाची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याचंही गावक-यांनी सांगितलं आहे. 

पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तिघांची नावे असून, चौघे अज्ञात सामील आहेत अशी माहिती कैमूर पोलीस अधिक्षक हरप्रीत कौर यांनी दिली आहे. 'पोलिसांची तीन पथकं हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. खासकरुन उत्तर प्रदेश सीमारेषेवरील परिसरात त्यांचा शोध घेतला जात आहे. आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांचीही मदत मागितली आहे', असं पोलीस अधिक्षक हरप्रीत कौर यांनी सांगितलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. 

 

Web Title: Sarat! The girl got married to a lower cast member and killed her parents and shot her to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.