आम आदमी पार्टी रचणार इतिहास? पंजाब विधानसभेला पहिल्या महिला सभापती मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 01:46 PM2022-03-15T13:46:18+5:302022-03-15T13:47:03+5:30

Aam Aadmi Party : आम आदमी पार्टीच्या आमदार सरबजीत कौर (Saravjit Kaur Manuke) पंजाबच्या पहिल्या महिला सभापती होऊ शकतात. मात्र, सभापती बनण्याच्या शर्यतीत बलजिंदर कौर (Baljinder Kaur) यांच्या नावाचाही समावेश आहे.

saravjit kaur might become first women speaker of punjab assembly | आम आदमी पार्टी रचणार इतिहास? पंजाब विधानसभेला पहिल्या महिला सभापती मिळण्याची शक्यता

आम आदमी पार्टी रचणार इतिहास? पंजाब विधानसभेला पहिल्या महिला सभापती मिळण्याची शक्यता

Next

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 92 जागा जिंकून इतिहास रचला आहे. 16 मार्च रोजी भगवंत मान  (Bhagwant Mann) पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सरकार स्थापनेसोबत आम आदमी पार्टी आणखी एक इतिहास रचणार आहे. आम आदमी पार्टीच्या आमदार सरबजीत कौर (Saravjit Kaur Manuke) पंजाबच्या पहिल्या महिला सभापती होऊ शकतात. मात्र, सभापती बनण्याच्या शर्यतीत बलजिंदर कौर (Baljinder Kaur) यांच्या नावाचाही समावेश आहे.

आम आदमी पार्टी महिला आमदाराला पंजाबच्या पुढील सभापती करणार हे निश्चित असले तरी. पंजाब विधानसभेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही महिला आमदाराला सभापती होण्याची संधी मिळालेली नाही. दिल्लीत आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी पंजाब विधानसभा सभापतीच्या नावावर चर्चा केली आहे.

इंग्रजी वृत्तपत्र द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पंजाब विधानसभेच्या पहिल्या महिला स्पीकर बनण्याच्या शर्यतीत सरबजीत कौर पुढे आहेत. सरबजीत कौर यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. आम आदमी पार्टी बलजिंदर कौर यांच्या नावावरही विचार करत आहे.

आम आदमी पार्टीला नवीन मंत्रिमंडळ स्थापनेची घाई नसल्याचे दिसून येते. आम आदमी पार्टीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की 16 मार्च रोजी केवळ भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नवनशहर जिल्ह्यात शहीद भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे हा शपथविधी सोहळा होणार आहे. पंजाब सरकारचे नवे मंत्रिमंडळ नंतर स्थापन होणार आहे.

आम आदमी पार्टी आपल्या आमदारांसाठी खास योजना बनवत आहे. पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या आमदारांसाठी आम आदमी पार्टीकडून प्रशिक्षणाची व्यवस्था करू शकते. दरम्यान, पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 117 जागांवर निवडणूक लढवली होती. 117 पैकी 92 जागा आम आदमी पार्टीने जिंकल्या आहेत. हेत. 

Web Title: saravjit kaur might become first women speaker of punjab assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.