सरदार पटेलांनी कुटुंबियांच्या भल्यासाठी सत्ता वापरली नाही - नरेंद्र मोदी
By Admin | Published: October 31, 2015 02:08 PM2015-10-31T14:08:24+5:302015-10-31T14:08:24+5:30
सरदार वल्लभभाई पटेल यांनी कधीही आपल्या कुटुंबाच्या सदस्याच्या भल्यासाठी राजकीय वजन वापरलं नसल्याचं सांगत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरू - गांधी कुटुंबावर शरसंधान केलं
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - सरदार वल्लभभाई पटेल यांनी कधीही आपल्या कुटुंबाच्या सदस्याच्या भल्यासाठी राजकीय वजन वापरलं नसल्याचं सांगत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरू - गांधी कुटुंबावर शरसंधान केलं. पटेलांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना देशाच्या एकतेसाठी झटलेल्या व्यक्तिंमध्ये चाणक्यांनंतर पटेलांचंच नाव घ्यावं लागेल असं मोदी म्हणाले. दिल्लीमध्ये रन फॉर युनिटी आयोजित करण्यात आली होती, जिचं उद्घाटन मोदींनी केलं.
एकता ही आपली सगळ्यात मोठी शक्ती असल्याचं सांगताना शनिवार पटेलांची जयंती हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आल्याचं ते म्हणाले.
आपल्या मुलाला डाह्याभाईला सरदार पटेलांनी कधीही व्यक्तिगत कामासाठी आपल्या नावाचा वापर करू नये असं बजावल्याची आठवण यावेळी त्यांनी करून दिली.
एक भारत, श्रेष्ठ भारत या योजनेचा उल्लेख यावेळी मोदींनी केला आणि या योजनेमध्ये एका राज्य दुस-या राज्याच्या संस्कृतीचा आणि भाषेचा प्रचार व प्रसार करेल असं त्यांनी सांगितले.
तीन दशकांपूर्वी आज इंदिरा गांधीची हत्या झाली, याची आठवण करून देत आज इंदिराजींची आठवण काढण्याचा दिवस असल्याचे मोदी म्हणाले.