वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या वारशाकडे मागील सरकारचं दुर्लक्ष, मोदींची काँग्रेसवर नाव न घेता टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 08:50 AM2017-10-31T08:50:31+5:302017-10-31T10:21:21+5:30

आधीच्या सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारसाकडे दुर्लक्ष केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

Sardar Patel's legacy was ignored by the previous government- narendra modi | वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या वारशाकडे मागील सरकारचं दुर्लक्ष, मोदींची काँग्रेसवर नाव न घेता टीका

वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या वारशाकडे मागील सरकारचं दुर्लक्ष, मोदींची काँग्रेसवर नाव न घेता टीका

Next
ठळक मुद्देआधीच्या सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारसाकडे दुर्लक्ष केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राष्ट्र निर्माणासाठी पटेल यांचं कार्य सरकारने दुर्लक्षित केलं, असं म्हणत मोदींनी काँग्रेसचं नाव न घेता टीका केली आहे.  

नवी दिल्ली-  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या वारशाकडे मागील सरकारांनी दुर्लक्ष केलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली. सरदार पटेल यांचं योगदान विस्मृतीत जावं, यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले, असंही यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. 

‘सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत आहे. त्यांनी देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचा देशाला अभिमान आहे. पण सरदार पटेल यांचं योगदान लोकांनी विसरावं, यासाठी काहींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. तरीही देशातील तरुणांच्या मनात सरदार पटेल यांच्याविषयी अतिशय आदराची भावना आहे. देश एकसंध ठेवण्यात सरदार पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळेच देशातील तरुणाई त्यांच्याकडे आदराने पाहते,’ असंही मोदींनी म्हंटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने मंगळवारी पटेल यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांचा एक दूरदृष्टी असलेला व्यक्ती, असा उल्लेख केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता काँग्रेसवर टीकाका केली आहे. पटेल यांचं नाव इतिहासातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांच्या प्रतिमेला लहान करण्याचाही प्रयत्न झाला. पण त्यांच्या कार्याला कधीही संपवलं जावू शकत नाही. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला. आज इंदिरा गांधी यांचीही पुण्यतिथी आहे. 



सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ता दिल्लीमध्ये रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. दिल्लीतील मेजर ज्ञानचंद नॅशनल स्टेडिअममध्ये हा कार्यक्रम पार पडला. 
दिल्लीतील या कार्यक्रमाला व्यंकय्या नायडू, गृहमंत्री राजनाथ सिंह, दिपा कर्माकर, सरदार सिंग, सुरेश रैना यांनीही हजेरी लावली. 





 

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाचं स्वातंत्र्य आणि देशाला एक करण्यासाठी आपलं जीवन व्यतीत केलं. पटेल यांनी साम, दाम, दंड आणि भेद वापरून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विखुरलेल्यांना एकत्र करण्याचं काम केलं आणि भारताला एका सुत्रात बांधलं.  कमी वेळेत पटेल यांनी देशाला एकतेच्या सुत्रात बांधलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं. मोदींनी यावेळी काँग्रेसवरही नाव न घेता टीका केली. 'या महापुरूषाचं नाव मिटविण्याचा प्रयत्न केला गेला, तसंच त्यांची प्रतिमा कमी करण्याचाही प्रयत्न झाला. पण पटेल हे असं व्यक्तीमत्त्व आहे ज्यांना, एक राजकीय पक्ष त्यांचा स्वीकार करो किंवा ना करो, राजकीय पक्ष त्यांचं महत्त्व स्वीकारो किंवा, पण या देशात आणि या देशातील तरुण पिढी पटेल यांना कधीही विसरणार नाही. 

'देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनीही पटेलांचा गौरव केला होता. देश एकसंघ आहे, ही पटेलांचीच देण असल्याचं राजेंद्र प्रसाद म्हणाले होते. पटेलांची प्रशासनावरही मजबूत पकड होती. त्यांचे कार्य आणि देशासाठी दिलेलं योगदान कायम स्मरणात रहावं म्हणून आज आपण त्यांच्या नावाने 'रन फॉर युनिटी'चं आयोजन केलं आहे', असंही मोदींनी म्हंटलं.


शीला दिक्षित यांनी फेटाळले मोदींचे आरोप

हे चुकीचं आहे, आम्ही कधीच सरदार पटेल यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केलेलं नाही, असं म्हणत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी मोदींनी केलेले आरोप फेटाळले आहे. 



 

Web Title: Sardar Patel's legacy was ignored by the previous government- narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.