मोटारसायकल रॅलीद्वारे सरदार पटेल यांना अभिवादन सरदार वल्लभभाई पटेल जयंती : अखिल भारतीय लेवा विकास महासंघातर्फे आयोजन
By admin | Published: November 2, 2016 12:40 AM2016-11-02T00:40:41+5:302016-11-02T00:40:41+5:30
जळगाव : अखिल भारतीय लेवा विकास महासंघातर्फे अखंडत्वाचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना १४१ व्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी शहरातील विविध भागातून मोटारसायकल रॅली काढून अभिवादन करण्यात आले.
Next
ज गाव : अखिल भारतीय लेवा विकास महासंघातर्फे अखंडत्वाचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना १४१ व्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी शहरातील विविध भागातून मोटारसायकल रॅली काढून अभिवादन करण्यात आले.काव्यरत्नावली चौकातून मोटारसायकल रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी आमदार सुरेश भोळे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.ए.जी.भंगाळे, उपमहापौर ललित कोल्हे, अ.भा.लेवा विकास महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष विष्णु भंगाळे, जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.संजय राणे, फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, डॉ.स्नेहल फेगडे, विरार येथील नगरसेविका सुरेखा कुरकुरे, केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे, ललित चौधरी, प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे, प्रा.आर.टी.चौधरी यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली.शिस्तबद्धपणे निघालेली ही रॅली आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, शिवाजी पुतळा, टॉवर चौक, चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, पांडे चौक, बीएसएनएल कार्यालय मार्गे सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे रॅलीचा समारोप झाला. याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.सुरेश अत्तरदे, महेंद्र पाटील, धनंजय तळेले, भूषण चौधरी, प्रा.नीलेश चौधरी, बिपीन झोपे, सुनील पाटील, राजीव चौधरी,रवी रडे, डिगंबर भंगाळे, राम पवार, साहेबराव भोई, रुपेश चौधरी, विलास नेहेते, अनिल कोळंबे, ललित खडके, प्रा.योगेश महाजन यांच्यासह अ.भा.लेवा विकास महासंघाचे पदाधिकारी व लेवा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.