बाजारात 'I love you' लिहिलेली साडी विक्रीला; लोकांना समजताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 10:15 AM2022-01-26T10:15:45+5:302022-01-26T10:15:58+5:30
एकीकडे केंद्र सरकार मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मोठ मोठी पाऊले उचलत आहेत, तर दुसरीकडे कापड व्यापारी साडीवर आय लव्ह यू प्रिंट करून बाजारात विकत आहेत.
राजस्थानच्या करौली जिल्ह्यात साडीवरील बुट्टीवर 'I love you' प्रिंट असलेल्या साड्या विकल्या जात होत्या. हे समजताच एका समाजाचे लोक रस्त्यावर आले आणि या साड्यांच्या विक्रीस विरोध केला. कापड विक्रेत्यांनी आपल्या फायद्यासाठी स्थानिक संस्कृतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे.
एकीकडे केंद्र सरकार मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मोठ मोठी पाऊले उचलत आहेत, तर दुसरीकडे कापड व्यापारी साडीवर आय लव्ह यू प्रिंट करून बाजारात विकत आहेत. हे कृत्य कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही, असे राजस्थानच्या मीना समाजाने म्हटले आहे.
याबाबत मीना समाजाच्या लोकांनी तोडाभीम उपविभागाचे मुख्यालय गाठून व्यापाऱ्यांची बैठक घेतली. अशा साड्या आता बाजारात विकल्या जाणार नाहीत आणि भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही व्यापाऱ्यांनी ग्रामस्थांना दिली. याप्रश्नी व्यापाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांची माफीही मागितली. यानंतर व्यापाऱ्यांनीही वेगळी बैठक घेत कोणत्याही दुकानदाराने अशाप्रकारची साडी व लुगडी विकायची नाही आणि भविष्यात असे कपडे कोणीही मागवायचे नाहीत, असा निर्णय सर्व व्यापाऱ्यांनी घेतला. अशा कपड्यांचा तरुणांवर चुकीचा परिणाम होतो, असा लोकांचा समज आहे.