Sariska Forest fire, Anjali Tendulkar : जंगलाला आग लागली अन अंजलीला वाघ बघायची हौस आली; डायरेक्टर करत बसला खातरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 04:32 PM2022-03-30T16:32:05+5:302022-03-30T16:32:27+5:30

राजस्थान येथील अलवर ( Alwar) जिल्ह्यात असलेल्या सरिस्का व्याघ्र (Sariska Forest fire)  अभयारण्याच्या डोंगरावर लागलेल्या आगीने भीषण स्वरून धारण केले आहे.

Sariska officials were doing safari to Sachin Tendulkar wife Anjali Tendulkar even after getting the news of the fire | Sariska Forest fire, Anjali Tendulkar : जंगलाला आग लागली अन अंजलीला वाघ बघायची हौस आली; डायरेक्टर करत बसला खातरदारी

Sariska Forest fire, Anjali Tendulkar : जंगलाला आग लागली अन अंजलीला वाघ बघायची हौस आली; डायरेक्टर करत बसला खातरदारी

googlenewsNext

राजस्थान येथील अलवर ( Alwar) जिल्ह्यात असलेल्या सरिस्का व्याघ्र (Sariska Forest fire)  अभयारण्याच्या डोंगरावर लागलेल्या आगीने भीषण स्वरून धारण केले आहे.  27 मार्चला लागलेल्या आगीवर अजूनही नियंत्रण मिळवता आलेले नाही आणि 20 किलोमीटरचे जंगल आगीत खाक झाले आहे आणि दोन डझनपेक्षा अधिक वाघ आणि अनेक चित्त्यांवर संकट ओढावले आहे. असं असताना येथील वन अधिकारी 27 मार्चला महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याची पत्नी अंजली ( Anjali Tendulkar) यांची खातरदारी करण्यात व्यग्र होते. अंजली तिच्या काही मैत्रिणींसोबत सरिस्का येथे फिरायला गेली आहे. स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार हे अधिकारी जंगलाला लागलेला आग विझवण्याचे सोडून अंजली तेंडुलकरची खातरदारी करण्यात लागले होते. 

रविवारी अंजली तेंडुलकर येथे मैत्रिणींसोबत फिरायला आली होती आणि यावेळी येथी मुख्य वन्य अधिकारी  ( Chief Conservator of Forests) आरएन मीणा आणि विभागीय वन अधिकारी  (Divisional forest officer) सुदर्शन शर्मा अन्य स्टाफसह अंजली यांच्यासाठी सफारीसाठी विशेष सोय करताना दिसले. मीणा यांनी स्वतः गाडी चालवली. अंजली यांनीही या सफारीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.


  
मीणा यांनी हे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, आग लागल्यावर डायरेक्टर ती विझवायला जात नाही. VIP मूव्हमेंट होती आणि नियमानुसार अंजली तेंडुलकर यांना सेवा दिली गेली. आग विझवण्यासाठी मी महत्त्वाचे निर्देश दिले होते. 

Web Title: Sariska officials were doing safari to Sachin Tendulkar wife Anjali Tendulkar even after getting the news of the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.