Sarkari Naukri 2021: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, RITES मध्ये विविध पदांसाठी भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 05:02 PM2021-07-16T17:02:56+5:302021-07-16T17:09:31+5:30
Sarkari Naukri 2021: जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 26 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहेत.
Sarkari Naukri 2021: रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस लिमिटेडने (Rail India Technical and Economic Service Limited) असिस्टंट मॅनेंजर आणि टेक्निशियनच्या पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. आरआयटीईएसच्या rites.com या अधिकृत वेबसाइटवर उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 26 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहेत.
या पदांवर होईल भरती
असिस्टंट मॅनेंजर - 6 पदं
टेक्निशियन - 20 पदं
शैक्षणिक पात्रता
असिस्टंट मॅनेंजर पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात इंजीनिअरिंगची डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. टेक्निशियनच्या पदांसाठी उमेदवाराकडे आयटीआयची डिग्री असणे आवश्यक आहे.
पोस्टाच्या 'या' 5 बचत योजना आहेत खास, गुंतवणुकीवर मिळेल दुप्पट लाभ https://t.co/O86MJJeJRg#PostOffice
— Lokmat (@MiLOKMAT) July 16, 2021
वयाची मर्यादा
या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी करण्यात आलेले अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकतात.
निवड प्रक्रिया
या पदांवर शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा
नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली तारीख - 14 जुलै 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 13 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाइट - rites.com