NCLनं १०वी पास असलेल्यांसाठी काढली मोठी नोकरभरती; असा करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 02:07 PM2020-07-14T14:07:53+5:302020-07-14T14:27:44+5:30

या पदांसाठी दहावी पास आणि विहित पात्रता असलेले 18 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. 17 जुलैपासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

sarkari naukri ncl operator recruitment 2020 operator trainee last date 23 july sarkari job vacancy | NCLनं १०वी पास असलेल्यांसाठी काढली मोठी नोकरभरती; असा करा अर्ज...

NCLनं १०वी पास असलेल्यांसाठी काढली मोठी नोकरभरती; असा करा अर्ज...

Next

नवी दिल्लीः गेल्या काही महिन्यांपासून देशावर कोरोनाचं संकट आहे. या संकटात हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल झालेले आहेत, तर अनेक जण बेरोजगारही झाले आहेत. पण या संकटाच्या काळातही अनेक सरकारी विभागात नोकरी दिली जात आहे. पोस्ट ऑफिस, सेबीसारख्या संस्थांनी नोकरीची ऑफर दिल्यानंतर आता NCLनं भरती काढली आहे. एनसीएल ऑपरेटर भरती 2020 अंतर्गत नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (एनसीएल) ने ऑपरेटर प्रशिक्षणार्थी पदांसाठी वेगवेगळ्या विभागांत 307 रिक्त जागांवर अर्ज मागवलेले आहेत. यात ड्रॅगलाइन ऑपरेटर, डोजर ऑपरेटर, ग्रेडर ऑपरेटर, डंपर ऑपरेटर आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे. या पदांसाठी दहावी पास आणि विहित पात्रता असलेले 18 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. 17 जुलैपासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. दुसरीकडे नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडने (एनसीएल) अकाऊंटंटसाठी अनेक पदे रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.  या पदांवर एकूण 93 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. शैक्षणिक पात्रता सर्व पदांसाठी स्वतंत्रपणे विहित आहेत. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. उमेदवार 17 जुलैपासून ऑनलाईन अर्ज करू शकतील.

वेबसाइट: nclcil.in
पोस्ट नाव: ऑपरेटर प्रशिक्षणार्थी
पोस्टची संख्या: 307
वेतनश्रेणी: या पदांवरील निवडक उमेदवारांना दररोज 1,011.27 रुपये मिळणार आहेत

रिक्त पदे
1. ड्रॅगलाइन ऑपरेटर - 09
2. डॉजर ऑपरेटर - 48
3. ग्रेडर्स ऑपरेटर - 11
4. डंपर ऑपरेटर - 167
5. शोवेल ऑपरेटर- 28
6. पे लोडर ऑपरेटर- 06
7. क्रेन ऑपरेटर - 21
8. ड्रिल ऑपरेटर - 17
एकूण पदांची संख्या - 307

शैक्षणिक पात्रता:  प्रशिक्षणार्थी ऑपरेटर पदावरील व्यक्तीला पात्रतेनुसार वेगवेगळ्या विभागात नोकरी दिली जाईल. 

> ड्रॅगलाइन ऑपरेटर : एनसीव्हीटी/एससीव्हीटी ट्रेड प्रमाणपत्र, मॅट्रिक/एसएससी/हायस्कूल किंवा समकक्ष पास आणि डिझेल मेकॅनिक/मोटर मेकॅनिक/फिटर ट्रेड व वैध एसएमव्ही परवाना भारत राज्यातील कोणत्याही आरटीए / आरटीओकडून जारी केलेला
> डोजर / ग्रेड ऑपरेटर : मॅट्रिक / एसएससी / हायस्कूल किंवा समकक्ष पास आणि कोणत्याही आरटीए / आरटीओकडून वैध एचएमव्ही परवाना
> मॅट्रिक / एसएससी / हायस्कूल किंवा इतर व्यवहारांसाठी समकक्ष पास आणि वैध एसएमव्ही परवाना भारताच्या कोणत्याही राज्यातील आरटीए /आरटीओकडून जारी केलेला

वयोमर्यादाः ऑपरेटर ट्रेनीच्या सर्व व्यवहारांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे असावे, तर जास्तीत जास्त वय वर्षे 30 असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. वयोमर्यादा 30 मार्च 2020च्या आधारे होणार आहे.

अर्ज फी: सर्वसाधारण / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 500 रुपये जमा करावे लागतील. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ईएसएम/विभागीय उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज फी भरली जाऊ शकते.

महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख - 17 जुलै 2020.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 23 जुलै 2017

अर्ज प्रक्रिया: ऑपरेटर प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज 17 जुलैपासून भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एनसीएलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी व दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट स्वतःकडे ठेवा.

निवड प्रक्रिया: पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.

----------------------------

पोस्ट तपशील 

अकाउंटंट / कॉस्ट अकाउंटंट टेक ग्रेड-ए -11

ओवरसीअर ग्रेड-सी - 35

अमीन ग्रेड डी -10

कनिष्ठ केमिस्ट टी अँड एस ग्रेड-डी -07

एकूण संख्या - 93

शैक्षणिक पात्रता: पदांनुसार वेगवेगळे ठरवले जातात.

१. अकाउंटंट / कॉस्ट अकाउंटंट टेक ग्रेड-ए: मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी पास किंवा समकक्ष परीक्षा पास, आयसीडब्ल्यूए किंवा सीएआयमधून इंटरमीडिएट परीक्षा पास.

२. ओवरसियर ग्रेड-सी: मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा

३. अमीन ग्रेड डी: मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि अमानत परीक्षा प्रमाणपत्र किंवा आयटीआय / समकक्षांकडील सर्व्हे प्रमाणपत्र

४.जुनियर केमिस्ट टी एंड एस ग्रेड-डी:  मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा आणि रसायनशास्त्रासह विज्ञान विषयात पदवी

वयोमर्यादाः या पदांसाठी किमान 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षे वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा 30 मार्च 2020 पासून मोजली जाईल.

अर्ज फी: सर्वसाधारण / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना 500 रुपये जमा करावे लागतील. एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी / ईएसएम प्रवर्गासाठी अर्ज विनामूल्य आहे. शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगद्वारे दिले जाईल.

अकाउंटंट/कॉस्ट अकाउंटंट टेक ग्रेड-A- 37063.41 प्रतिमहिना

ओवरसीअर ग्रेड-सी - 31852.56 दरमहा

अमीन ग्रेड डी - 29460.30 दरमहा

कनिष्ठ केमिस्ट टी आणि एस ग्रेड-डी- 29460.30 दरमहा

हेही वाचा

20 लाख रुपये किलोनं विकला जातो भारतातील 'हा' किडा, पण चीननं सगळा 'राडा' केला!

अमेरिकेच्या प्रभावात असलेल्या भारताला इराणचा झटका; 'या' मोठ्या परियोजनेतून केलं बाहेर

यशस्वी गुंतवणूकदार व्हायचंय? तर या ५ सवयींचं नक्की पालन करा!

चीनविरोधात जगभरात रोष; भारतासाठी हीच सुवर्णसंधी- नितीन गडकरी

लेहपासून 250 किमी अंतरावर चीनकडून भूमिगत 24 क्षेपणास्त्रे तैनात; भारताची चिंता वाढवणारा खुलासा

चीनमध्ये नव्या संकटानं पसरली भीती; 3.8 कोटी लोक प्रभावित, 140 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : जागतिक स्तरावर परिस्थिती भयंकर; यूरोप अन् आशियातील बरेच देश चुकीच्या मार्गावर- WHO

अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी

Web Title: sarkari naukri ncl operator recruitment 2020 operator trainee last date 23 july sarkari job vacancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.