Sarkari Nokari : लेखी परीक्षेचे टेन्शन नाही! फक्त मुलाखतीवर बँकेसह या विभागांत सरकारी नोकऱ्यांची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 03:29 PM2020-07-18T15:29:45+5:302020-07-18T19:06:42+5:30
पोस्ट ऑफिस (India Post), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL), झारखंड लोक सेवा आयोग (JPSC), कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard) आणि बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) एकूण 1045 जागांवर भरती करण्यात येत आहे. परीक्षा न घेता ही भरती केली जाणार असल्याने सरकारी नोकरीतील (Sarkari Naukri) एक अडथळा आधीच दूर झाला आहे.
सरकारीनोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये नोकर भरती सुरु झाली आहे. पोस्ट ऑफिस (India Post), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL), झारखंड लोक सेवा आयोग (JPSC), कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard) आणि बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) एकूण 1045 जागांवर भरती करण्यात येत आहे. परीक्षा न घेता ही भरती केली जाणार असल्याने सरकारीनोकरीतील (Sarkari Naukri) एक अडथळा आधीच दूर झाला आहे.
India Post Recruitment 2020: भारतीय पोस्ट खात्यामध्ये जम्मू आणि काश्मीर सर्कलमध्ये ग्रामीण पोस्टमनसाठी (GDS) 422 जागांवर भरती आयोजित केली आहे. याशिवाय शाखा पोस्टमास्तर. सहाय्यक शाखा पोस्टमास्तर, टपाल सेवक आदी जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी 5 ऑगस्टपूर्वी अर्ज करता येणार आहे.
PGCIL Apprentice Recruitment 2020: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मध्ये अप्रेंटिससाठी ट्रेनी पदांवर भरती काढण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या ट्रेडमधील 147 जागा भरल्या जाणार आहेत. या जागांवर इलेक्ट्रिकल, सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंग, डिप्लोमा किंवा आयटीआय झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. या जागांवर उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवची तारीख 10 ऑगस्ट आहे.
JPSC Recruitment 2020: झारखंड लोकसेवा आयोगाद्वारे (JPSC) असिस्टंट टॉवर प्लॅनरच्या 77 जागांवर भरती करण्यात येत आहे. यासाठी कमीतकमी वय 21 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 38 वर्षे ठेवण्यात आले आहे. तसेच यासाठी अर्ज करण्याची शेवची तारीख 10 ऑगस्ट आहे. य़ोग्य उमेदवारांची निवड शिक्षण आणि मुलाखतीवरून केली जाणार आहे.
Bank of Baroda Recruitment 2020: बँक ऑफ बडोदा (BOB)मध्ये सुपरवाइजर पदावर 49 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. केवळ मुलाखत घेण्यात येणार आहे. यासाठी वयाची अट 21 ते 45 वर्षे ठेवण्यात आली आहे.
Cochin Shipyard Apprentice Recruitment 2020: कोचीन शीपयार्ड लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्नीशियन (व्होकेशनल) अप्रेंटिससाठी 350 जागांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. वेगवेगळ्या ट्रेडसाठी ही भरती आहे. त्या ट्रेडमध्ये इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट आहे. इथेही पदवीला मिळालेल्या मार्कांनुसार यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर मुलाखत घेऊन नियुक्ती केली जाणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या....
Video: "सुशांतचा आत्मा स्वर्गात, त्याच्यासोबत महिलाही"; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा
ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी
राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप
चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर
लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...
अखेर पॉझिटिव्ह बातमी आली! सीरम इन्स्टिट्यूटला मोठा दिलासा; ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी यशस्वी
हेल्थ इन्शुरन्समध्ये मोठे बदल झाले; कोरोना काळात जाणून घेणे महत्वाचे
स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार
ब्रेझा, व्हेन्यूला विसरणार; नवी एसयुव्ही Magnite पाहताच भले भले व्वा म्हणणार
छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी
चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत