UPPCLमध्ये बंपर भरती; १०वी पासही करू शकतात अर्ज, थेट सातव्या आयोगानुसार मिळणार पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 04:23 PM2020-07-21T16:23:50+5:302020-07-21T16:24:18+5:30
या भरती अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवार आता 4 ऑगस्ट 2020पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात.
उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (UPPCL) 600हून अधिक पदांवर भरती काढली आहे. या भरती अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवार आता 4 ऑगस्ट 2020पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. UPPCL Technician Electrical Recruitmentअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगांतर्गत मॅट्रिक्स लेव्हल 4नुसार पगार देण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवाराला दरमहा 27,200 रुपये (किमान पगार) व इतर भत्ते दिले जातील.
या भरतीसाठी एका मान्यताप्राप्त मंडळाकडून उमेदवाराकडे गणित व विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासह उमेदवाराला इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रिकलमधील कोणतंही 2 वर्षांचे प्रमाणपत्र (NCVT/SCVT) असणे देखील अनिवार्य आहे. या भरतीसाठी अर्ज करणारे Gen/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 1000 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर अनुसूचित SC/STच्या उमेदवारांना 700 रुपये द्यावे लागतील.
पदांची माहिती
UPPCLने ऊर्जा विभागात 608 तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार uppcl.org अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी पहिल्यांदा अर्जाची शेवटची तारीख 22 जुलै 2020 ठरवण्यात आली होती. परंतु आता UPPCLने ती वाढवून 04 ऑगस्ट 2020 केली आहे. त्याचबरोबर या भरतीसाठी 6 ऑगस्ट 2020पर्यंत अर्ज फी जमा करता येणार आहे. या भरतीसाठी 18 वर्षे ते 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना 5 वर्षांची सवलत मिळणार आहे. वयाची मर्यादा 1 जानेवारी 2020 पर्यंत ग्राह्य धरली जाणार आहे.
हेही वाचा
फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'
पाकिस्तानचा चीनला दे धक्का; बिगो अॅप बॅन, आता टिकटॉकवर टांगती तलवार
माइन्समध्ये लपलेल्या शत्रूलाही शोधून करणार ठार, 'या' तंत्रज्ञानानं भारताचे टी-90 टँक सुसज्ज
चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळलं ही तर अफवा; इराणनं केलं स्पष्ट
देशात राहणार आता फक्त ५ सरकारी बँका; मोदी सरकार भागीदारी विकणार
आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती