सारोळे सिंगल बातम्या...

By admin | Published: July 31, 2015 12:22 AM2015-07-31T00:22:55+5:302015-07-31T00:22:55+5:30

आडम यांच्या स्मृतिदिनानिमित्त २0१ जणांचे रक्तदान

Sarole Single News ... | सारोळे सिंगल बातम्या...

सारोळे सिंगल बातम्या...

Next
म यांच्या स्मृतिदिनानिमित्त २0१ जणांचे रक्तदान
सोलापूर : कॉ. नारायणराव आडम प्रबोधन केंद्राच्या वतीने कॉ. स्वा. से. आडम यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुंभारी येथील गोदूताई घरकूल येथे आयोजित रक्तदान शिबिरात २0१ जणांनी रक्तदान केले. यावेळी सिद्धप्पा कलशे˜ी, कुरमय्या म्हेत्रे, युसूफ शेख, नगरसेवक माशाप्पा विटे, कामिनी आडम, राज आडम, दत्तोबा आडम, सलीम मुल्ला, सलीम पटेल, सिद्धाराम उमराणी, रफिक शेख, अशोक इंदापुरे, सुरेश फलमारी उपस्थित होते. विल्यम ससाणे, हसन शेख, बापू साबळे, आप्पाशा चांगले, रफिक काझी यांनी परिश्रम घेतले.
क्रीडा संकुल ते शानदार चौक रस्त्याचे नामकरण
सोलापूर : जिल्हा क्रीडा संकुल ते शानदार चौकापर्यंतच्या रस्त्याला स्व. म. मंजनवाले रोड असे नामकरण करण्यात आले. नामफलकाचे अनावरण परिवहनचे सभापती सलीम पामा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक रियाज हुंडेकरी, माजी महापौर हारून सय्यद, मालतुमकर, धोत्रे, राजू क्षीरसागर, भारत बाबर, पी. एम. गायकवाड, भाले, कांबळे, लांबतुरे, विशाल दोडमनी, अफसर शेख, मुसा जहागीरदार आदी उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेत सुमतीबाई स्कूलचे यश
सोलापूर : लोकमंगल बँक व फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमधील चौथीतील विद्यार्थिनी वेदा डोईफोडे हिने यश संपादन केले. ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला. तिच्या यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी अधिकारी हर्षवदन शहा, प्रशासकीय अधिकारी देवई उपाध्ये, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रत्नश्री तळे, सहशिक्षक रोहन घाडगे, अनुराधा केकडे यांनी अभिनंदन केले.
एम्स केंद्रातर्फे एमपीएससीवर चर्चासत्र
सोलापूर: विकासनगरातील एम्स स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे एमपीएससीची परीक्षा या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. कृषी अधीक्षक गंगाधर कांबळे यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी, यावर मार्गदर्शन केले. प्रा. महादेव कांबळे व डॉ. हरवाळकर यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद केले. प्रास्ताविक प्रा. भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन सुकांत वाघमारे यांनी केले तर प्रा. दामोदर बनसोडे यांनी आभार मानले.
वालचंदमध्ये नेट-सेटवर कार्यशाळेचे आयोजन
सोलापूर : वालचंद महाविद्यालयाच्या वतीने २ ऑगस्ट रोजी नेट-सेटवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत रसायन, वनस्पतीशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, भूगोल, हिंदी व समाजकार्य या विषयावर संबंधित तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे यांनी केले आहे.
परिवर्तन पार्टीतर्फे नागरी समस्या अभियान
सोलापूर : परिवर्तन समता पार्टीच्या वतीने शहरातील विविध प्रभागात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. महिला शहर अध्यक्ष संगीता बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली महादेवी होळकर, परवीन मुतवल्ली, महेबुबी करकंब, पूनम बनसोडे, सीमा केलूर, शांतय्या पाटील यांनी प्रभाग ४१ मधील शशिकलानगर, पाटीलनगर, महादेवीनगर, नई जिंदगी रोड, शांतीनगरातील समस्या जाणून घेतल्या.

Web Title: Sarole Single News ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.