सरपंच...विरोधी पक्षनेते ते महसूल व कृषी मंत्री एकनाथराव खडसेंची वाटचाल: पक्षातील अनेक पदेही भूषविली

By admin | Published: June 4, 2016 06:32 PM2016-06-04T18:32:28+5:302016-06-04T18:32:28+5:30

१९७६ : ग्राम पंचायतीपासून खडसे यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केेली. त्या काळात तेव्हाच्या एदलाबाद मतदारसंघात प्रतिभाताई पाटील, प्रल्हादराव पाटील, हरिभाऊ जवरे यांचे प्रस्थ होते त्यामुळे त्याकाळात खडसेंना प्रारंभी अपयश पदरी आले.

Sarpanch ... Opposition Leader from Revenue and Agriculture Minister Eknath Rao Khadse | सरपंच...विरोधी पक्षनेते ते महसूल व कृषी मंत्री एकनाथराव खडसेंची वाटचाल: पक्षातील अनेक पदेही भूषविली

सरपंच...विरोधी पक्षनेते ते महसूल व कृषी मंत्री एकनाथराव खडसेंची वाटचाल: पक्षातील अनेक पदेही भूषविली

Next
७६ : ग्राम पंचायतीपासून खडसे यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केेली. त्या काळात तेव्हाच्या एदलाबाद मतदारसंघात प्रतिभाताई पाटील, प्रल्हादराव पाटील, हरिभाऊ जवरे यांचे प्रस्थ होते त्यामुळे त्याकाळात खडसेंना प्रारंभी अपयश पदरी आले.
१९८० : १०८० मध्ये मुक्ताईनगर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत खडसेंच्या नेतृत्वाखालील पॅनलने मुसंडी मारली. त्यांना प्रथम क्रमांकांच्या पसंतीचे मतदान झाले. खरेदी विक्री संघाचे ते चेअरमनही झाले. दरम्यानच्या काळात कोथळी ग्राम पंचायतीतही यश मिळाले.
सरपंचपद : कोथळी ग्रामपंचायतीचे सरपंचपदही त्यांनी भूषविले. यानंतर पं.स.सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीतही यशस्वी काम केले.
१९९० : १९९० च्या कालखंडात भाजपाने प्रथम विधानसभेसाठी त्यांना संधी दिली. भाजपाचा तो स्थापनेचा काळ होता. तालुका अध्यक्ष, पक्षाचे जिल्हाध्यक्षपद भूषविण्याची संधीही याच काळात मिळाली.
१९९१ : १९९१ मध्ये भाजपचे विधानसभेतील प्रतोद ही जबाबदारी भूषविली.
१९९५ : नंतर युती शासनाच्या काळात प्रथम उच्च शिक्षण मंत्री, अर्थ मंत्री व त्यानंतर पाटबंधारे मंत्री म्हणून जबाबदारी आली. १९९९ मध्ये सहा महिने अगोदरच युती सरकारने विधानसभा बरखास्त केली होती.
१९९९ : विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेत आले. या काळात विरोधी पक्षातील पक्षाकडील महत्वाचे पद म्हणजे विधीमंडळ गटनेतेपद ही जबाबदारीही खडसेंवर आली.
२०१० ते २०१४ : भाजपा- शिवसेना युती विरोधात असताना प्रथम विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे होते. नंतर शिवसेनेतून एक गट वेगळा होऊन मनसेची निर्मिती झाल्यानंतर शिवसेनेचे संख्याबळ कमी होऊन भाजपाचे संख्याबळ वाढले व विरोधी पक्षनेतेपद भाजपाकडे येऊन खडसे विरोधी पक्षनेते झाले.
२०१४ : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूक होऊन राज्यात शिवसेनेच्या मदतीने पुन्हा भाजपाचे सरकार सत्तेत आले. मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत खडसे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यांना दोन नंबरचे स्थान देण्यात आले. महसूल कृषीसह एक डझन मंत्रालयांचा कार्यभार त्यांच्याकडे आला.

Web Title: Sarpanch ... Opposition Leader from Revenue and Agriculture Minister Eknath Rao Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.